शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

काम पूर्ण होण्याआधीच परभणी- गंगाखेड सिमेंट रस्त्याला तडे... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:46 IST

परभणी ते गंगाखेड या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न राज्यभर गाजला होता.

ठळक मुद्देअनेक आंदोलने केल्यानंतर या रस्त्याच्या निर्मितीचा प्रश्न मार्गी लागला. महातपुरी पाटी ते दुसलगाव पाटी या रस्त्यावर जागोजागी भेगा पडल्या आहेत.

गंगाखेड :   परभणी- गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच या रस्त्याला तडे गेल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता किती काळ टिकेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

परभणी ते गंगाखेड या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न राज्यभर गाजला होता. अनेक आंदोलने केल्यानंतर या रस्त्याच्या निर्मितीचा प्रश्न मार्गी लागला. शासनाने या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन रस्ता निर्मितीला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात रस्ता कामासाठी २०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. वर्षभरापूर्वी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, एका बाजूचे सिमेंट काँक्रेटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी हे काम करीत असताना दर्जा राखला गेला नाही. परिणामी रस्त्याला अनेक भागात तडे गेले आहेत.

गंगाखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या महातपुरी पाटी ते दुसलगाव पाटी या रस्त्यावर जागोजागी भेगा पडल्या आहेत. लांब अंतरापर्यंत असलेल्या या भेगांमुळे हा रस्ता किती काळ टिकेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. मात्र त्यापूर्वीच रस्ताला तडे गेल्याने वाहनधाकांतून संताप व्यक्त केला जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

दबाई करताना काळ्या मातीचा वापरया रस्त्याचे काम करण्यासाठी कंत्राटदाराने अनेक भागात मुरुमाऐवजी काळ्या मातीचा वापर केला. सिमेंट रस्त्याच्या खालचा थर मुरुम टाकून दबाई करुन घेणे आवश्यक होते. मात्र सर्रास काळी माती मिश्रित मुरुमाचा वापर करण्यात आला. त्यावर सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले.  त्यामुळे पावसाचे पाणी मातीत मुरले जात असून, रस्त्याला तडे पडले आहेत. याच भागात काही ठिकाणी तर सिमेंट काँक्रीट रस्त्याचा वरील भाग चक्क उखडून गेला आहे. काही  ठिकाणी मोठे खड्डेही पडले आहेत.  किमान रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही वर्षे तरी हा रस्ता चांगला राहील, ही वाहनधारकांची अपेक्षा फोल ठरली आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षाfundsनिधी