शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

परभणी सामूहिक अत्याचार अन् दरोडा; तपासात पोलिसांची गोपनीयता, आरोपींच्या शोधात ९ पथके

By राजन मगरुळकर | Updated: January 4, 2025 19:27 IST

पारवा शिवारातील एका आखाड्यावर शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार झाला.

परभणी : तालुक्यातील पारवा शेतशिवारामध्ये शुक्रवारी झालेल्या सामूहिक अत्याचार आणि दरोडा प्रकरणात जिल्हा पोलिस दलाने आरोपींच्या शोधासाठी नऊ पथकांची निर्मिती केली. ही पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. या प्रकरणात शुक्रवारी रात्री उशिरा परभणी ग्रामीण ठाण्यात अनोळखी पाच इसमांविरुद्ध विविध कलमांन्वये दरोडा आणि सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

पारवा शिवारातील एका आखाड्यावर शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार झाला. या घटनेत पीडित महिलेने फिर्याद दिली. फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबातील पती, सासू असे तिघेजण घरामध्ये असताना मध्यरात्री अज्ञात पाच जणांनी प्रवेश करून फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारून जखमी केले, तसेच फिर्यादीच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. फिर्यादीच्या नातवाचे घरातील बॅगमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने काढून घेतले. याशिवाय सासूला काठीने मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीवर जबरदस्तीने अत्याचार केला. संबंधित घटनेनंतर फिर्यादी, त्यांची सासू व पती यांना खोलीत बंद करून खोलीला बाहेरून कुलूप लावून हे सर्व आरोपी निघून गेले. नंतर बराच काळ हे तिघेही घरातील खोलीमध्ये जखमी अवस्थेत पडले होते. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीला आल्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

फिर्यादीच्या पतीची तब्येत अजूनही गंभीरपीडित फिर्यादी महिलेच्या पतीला खासगी दवाखान्यात उपचारास दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत अजून गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दोन लाख सहा हजारांचा मुद्देमाल लांबविलाफिर्यादीचे, फिर्यादीच्या नातवाचे, सासूचे सोन्या-चांदीचे दागिने मिळून एकूण दोन लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लांबविला आहे. याप्रकरणी परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ३१० (२), ३११, ६४ (एल), ७० (१), ३३३, ३५१ (३) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे करीत आहेत.

तो कोठे आहे, म्हणत केला घरात प्रवेश...या घटनेमध्ये अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या घरात प्रवेश करून फिर्यादी व तिच्या पतीस एक इसम (तो) कोठे आहे, आम्हाला त्याला मारायचे आहे, असे म्हणून प्रवेश केला. यानंतर एका इसमाने हातातील कुऱ्हाडीने फिर्यादीच्या डोक्यात जोराने मारून जखमी केले. शिवाय फिर्यादीचा पती आणि सासू यांनाही या दरोडेखोरांनी गंभीर मारहाण केली. आता घटनेतील फिर्यादीप्रमाणे त्या व्यक्तीचा उल्लेख कशासाठी व कोणत्या कारणांनी केला याचा तपास सुरू आहे.

नऊ पथकांकडून शोधपोलिस यंत्रणेकडून घटनेचा गंभीरतेने तपास सुरू आहे. सर्व प्रकारे सखोल चौकशी, तपासणी आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलिस पथक भेट देऊन आरोपींचाही शोध घेत आहेत. सर्व प्रकरणाच्या तपासासाठी एकूण नऊ पथके स्थापन केली आहेत.- रवींद्रसिंह परदेशी, पोलिस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी