शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पूर्णेत १३८५ एलईडी दिव्यांचा लखलखाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:59 IST

शहरातील जुने पथदिवे बदलून त्याठिकाणी एलईडी दिवे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत विविध भागांत १ हजार ३८५ नवीन एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा: शहरातील जुने पथदिवे बदलून त्याठिकाणी एलईडी दिवे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत विविध भागांत १ हजार ३८५ नवीन एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत.शासनाच्या एनर्जी इफीसिइन्स सर्व्हिसेस मार्फत शहरात नवीन पथदिवे बसविण्यात येत आहेत. या कंपनीने आतापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांसह कॉलनीतील रस्ते व इतर परिसरात १८ वॅटचे ११८०, ३५ वॅटचे १४०, ७० वॅटचे ५० तर ४५ वॅटचे १५ पथदिवे बसविण्यात आले आहेत. शहरातील शिवाजी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, जामा मशिद परिसरात प्लड लाईट बसविण्याची प्रक्रिया सुरु आहे. रस्त्यावरील बदललेल्या दिव्यांमुळे एरव्ही अंधारात असलेले रस्ते रात्रीच्या वेळी झळाळून गेले आहेत. पथदिवे बदलल्यामुळे वीज बिलाची दरमाह कपात होणार आहे.पुढील ७ वर्षे या पथदिव्यांच्या दुरुस्ती आणि सुधारणेची जबाबदारी तसेच पथदिवे लावणे व बंद करणे करणे संबंधित कंत्राटदाराकडे राहणार आहे.वीज बिलात होणार कपात४शहरात बसविण्यात आलेल्या पथदिव्यापोटी वीज वितरण कंपनीकडून मोठ्या प्रमाणात वीज देयके येत होते; परंतु, एलईडी पथदिव्यांमुळे वीज बिलात कपात होणार आहे. त्याच बरोबर रस्ते झळाळणार आहेत.पथदिव्यांसाठी ५० विद्युत मीटर जोडणीची मागणी४शहरातील पथदिव्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी यापूर्वी महावितरणकडून ११ मीटर जोडणी देण्यात आली होती. सद्यस्थितीत केवळ ५ मीटर सुरु आहेत. पालिका प्रशासनाला नवीन पथदिव्यांसाठी शहरात एकूण ५० मीटर जोडणीची आवश्यकता असून तशी लेखी मागणी वीज वितरण कंपनीकडे करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार