शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत भर दिवसा घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:54 IST

शहरातील जायकवाडी परिसरात असलेल्या रविराज पार्कमध्ये चोरट्यांनी भरदिवसा दोन घरे फोडून नगदी रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लांबविले आहेत़ या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील जायकवाडी परिसरात असलेल्या रविराज पार्कमध्ये चोरट्यांनी भरदिवसा दोन घरे फोडून नगदी रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लांबविले आहेत़ या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़रविराज पार्क भागात विजय सोनी यांचे निवासस्थान आहे़ सोनीे यांच्या घरातील सदस्य बाहेरगावी गेले असल्याने बुधवारी दिवसभर या घराला कुलूप होते़ सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सोनी घरी परतले तेव्हा दरवाजा उघडा दिसला व कुलूप तुटलेले होते़ आतमध्ये जाऊन पाहिले तेव्हा सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते़ चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली़उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी यांच्यासह नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरसिंग ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक पवार, बीट जमादार शेख गौस, रमेश मुजमुले यांनी घटनास्थळी भेट दिली़ चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण केले होते़ श्वानाने याच भागात असलेल्या मातोश्रीनगराजवळील कॅनॉलच्या पुलापर्यंत माग काढला़ ठसे तज्ज्ञांनी ठसे घेतले आहेत़ मिळालेल्या माहितीनुसार सोनी यांच्या घरातील नगदी २ हजार रुपये आणि अडीच तोळे सोने, एक तोळा चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत़ तर सोनी यांच्या घराशेजारीच बिनॉय हे केरळीयन कुटूंब वास्तव्याला आहे़ हे घरही चोरट्यांनी फोडले़ परंतु, या ठिकाणी किरकोळ साहित्याची चोरी झाली़ भर दिवसा दोन घरे फोडल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ दरम्यान, या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता़पूर्णेत दोन लाखांची घरफोडीपूर्णा : शहरातील क्रांतीनगर भागात ९ जानेवारी रोजी मध्यरात्री चोरट्यांनी घरात घुसून २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लांबविला़ या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़ शहरातील क्रांतीनगर भागातील रहिवाशी अजमत खान सालार खान पठाण यांच्या घरात मंगळवारी रात्री चोरट्यांनी प्रवेश केला़ घराच्या छतावरून चोरटे आत शिरले़ घरातील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी १ लाख ५० हजार रुपये असा २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर अजमत खान पठाण यांनी पोलिसांना माहिती दिली़ रात्री गस्तीवर असलेले फौजदार गणेश राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यानंतर परिसरातील रस्त्यांवर नाकेबंदी करून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला़ मात्र चोरटे सापडले नाहीत़ अजमत खान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे़