शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाथरी तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:26 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी पाथरी येथे १७ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. सोमवारी तालुक्यातील विद्यार्थिनींंसह महिला व समाजबांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी पाथरी येथे १७ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. सोमवारी तालुक्यातील विद्यार्थिनींंसह महिला व समाजबांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता.पाथरी येथे १९ जुलैपासून सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. ६ आॅगस्ट रोजी महिला, विद्यार्थी व सकल मराठा समाजाच्या वतीेने तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला.सकाळी १० वाजल्यापासून राष्टÑीय महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात समाजबांधव दाखल झाले. या मोर्चामध्ये सुरुवातीला मुली, महिला, मुले व त्यानंतर समाजबांधव अशा रांगेत मोर्चा निघाला. हा मोर्चा प्रमुख रस्त्यावरून तहसील कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण का आवश्यक आहे? यावर काही मुलींनी मार्गदर्शन केले. तब्बल दोन तास तहसील कार्यालयात हे आंदोलन चालले. आंदोलनकर्त्या पाच मुलींनी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांना दिले. यावेळी तहसीलदार एस.डी. मांडवगडे यांची उपस्थिती होती. दरम्यान, मोर्चा तहसील कार्यालयात आल्यानंतर एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.आरक्षणासाठी सोनपेठमध्ये जागरसोनपेठ- मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोनपेठ शहरात सोमवारी सकाळी जागर गोंधळ घालण्यात आला़सोनपेठ येथे शिवाजी चौकात शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे़ तालुक्यातील मराठा समाजबांधव या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत़दररोज नवनवीन उपक्रम राबविले जात असून, सोमवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जागर गोंधळ घालण्यात आला़ दुपारी विविध वक्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचे निवेदनजिंतूर- राज्य शासनाने घोषित केलेले मुस्लिम आरक्षण तात्काळ लागू करावे, अशी मागणी जिंतूर येथील मुस्लीम समाजबांधवांनी ६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे़जनजागरण समिती शाखा जिंतूर, जमियत ए उलमा या संघटनांसह स्थानिक मुस्लिम समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते़ १९ जुलै २०१४ रोजी न्यायालयाने मुस्लिम समाजास आरक्षण लागू करण्यासंदर्भात आदेश दिले आहे़ मात्र २०१४ नंतर भाजप सरकारने आरक्षण देण्यास टाळाटाळ केली आहे़ तेव्हा मुस्लिम समाजालाही तातडीने ५ टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे़मुंडण करून निषेधसेलू- मराठा क्रांती ठोक मोर्चाला दिवसेंदिवस पाठींबा वाढत असून, रविवारी सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील मराठा युवकांनी मुंडण करून भाजप सरकारचा निषेध नोंदविला़मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी तालुक्यात १५ दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू असून, अद्याप शासनाने निर्णय घेतला नाही़ रविवारी डिग्रसवाडी येथील अनंत लेवडे या युवकाने आरक्षणासाठी स्वत: पेटवून घेत आत्महत्या केली़ मात्र तरीही शासन वेळकाढूपणा करीत आहे़ त्यामुळे गुगळी धामणगाव येथील युवकांनी मुंडण करून शासनाचा निषेध नोंदविला़

टॅग्स :parabhaniपरभणीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाreservationआरक्षण