शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : स्वतंत्र विद्युत रोहित्रासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:51 IST

शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील हाजी हामीद कॉलनीत स्वतंत्र विद्युत रोहित्र देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी रहिवाशियांनी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील हाजी हामीद कॉलनीत स्वतंत्र विद्युत रोहित्र देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी रहिवाशियांनी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला.शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील हाजी हामीद कॉलनीमध्ये मजहरबाबा डीपी क्रमांक ७२२ वर सुरळीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्याच बरोबर या ठिकाणी दोन विद्युत पोलची आवश्यकता असताना केवळ एकाच विद्युत पोलावरुन जवळपास ४० ते ५० वीज जोडण्या आहेत. तसेच २०० ते २५० फुटावरुन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.त्यामुळे थोडासा वारा किंवा पाऊस झाला तर वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे रात्र- रात्र हाजी हमीद कॉलनीतील रहिवाशियांना अंधारात काढावी लागत आहे. याबाबत अनेक वेळा वीज कर्मचाऱ्यांकडे गाºहाणे मांडूनही उपयोग होत नसल्याने या रहिवाशियांनी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शहर वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकारी अभियंता लोंढे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.यामध्ये स्वतंत्र विद्युत रोहित्र देण्यात यावे, जुनाट झालेल्या वीज तारा, वाकलेले खांबे दुरुस्त करुन देण्यात यावेत, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा आदी मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.निवेदनावर शकील मोहियोद्दीन, रहीम अन्सारी, शेख नबाब, शेख अकबर, तहसीन अन्सारी, बानो बेगम, नुरजहाँ बेगम, सिद्दीका बेगम, फर्जना बेगम, रबिया बेगम, नुसरत बेगम, रजिबा बेगम, रेहाना बेगम, नजमाबी, नसरीन बेगम, खैरोनीसा बेगम, शबाना बेगम, रेहाना बेगम, आरेफा बेगम यांच्यासह रहिवाशियांच्या स्वाक्षºया आहेत. येत्या काही दिवसात योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला.दरम्यान, वीज वितरण कंपनी शहरासह ग्रामीण भागात सुरळीत वीज पुरवठा व्हावा, यासाठी अनेक उपक्रम, योजना राबवित आहे; परंतु, परभणी शहरातीलच नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी मोर्चा काढावा लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी दुरुस्ती करावी तसेच स्वतंत्र डीपी देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मोर्चेकºयांच्या वतीने ‘लोकमत’शी बोलताना करण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणagitationआंदोलन