शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वेगवेगळ्या प्रकरणांतील चार फरार आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:18 IST

पोटगी प्रकरणासह इतर वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पोटगी प्रकरणासह इतर वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या चार आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे़पाथरी तालुक्यातील कानसूर तांडा येथील आरोपी साहेबराव गुणाजी पवार हा पोटगी वॉरंट प्रकरणामध्ये हवा होता़ पोलिसांनी ६ आॅक्टोबर रोजी त्यास कानसूर शेत शिवारातून ताब्यात घेतले़ त्याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले़ तसेच पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या एका गुन्ह्यात आरोपी शंकर विष्णू पवार (रा़ पाथरी) हा दोन वर्षांपासून फरार होता़ या आरोपीलाही पोलिसांनी पाथरी तालुक्यातील वाघाळा येथून ताब्यात घेतले असून, त्यास पालम पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले़ चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या सुनील भिकाजी कांबळे यास तहसील कार्यालय पाथरी परिसरातून पोलिसांनी अटक केली़ त्याच प्रमाणे दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या राहुल गौतम गाडे यास पोलिसांनी ६ आॅक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे़ या चारही आरोपींना त्या त्या पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले़ ही कामगिरी स्थानिक गुन्हा अन्वषेण शाखेच्या पथकाने केली़

टॅग्स :parabhaniपरभणीArrestअटकPoliceपोलिस