शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तीन वर्षांच्या सर्व्हेक्षणात आढळले ९४ मुन्नाभाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:07 IST

जिल्ह्यातील आरोग्य विभागाने २०१७ पासून परवाना नसणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कारवाई सुरु केली असून त्यात मागील तीन वर्षांमध्ये ९४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर्षीही ही मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील आरोग्य विभागाने २०१७ पासून परवाना नसणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कारवाई सुरु केली असून त्यात मागील तीन वर्षांमध्ये ९४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर्षीही ही मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.कोणताही वैद्यकीय परवाना नसताना केवळ पैशांच्या अमिषापोटी जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळणाºया बोगस डॉक्टरांवर जिल्हा प्रशासनाने बडगा उगारला आहे. ग्रामीण भागात अशा डॉक्टरांची संख्या अधिक असते. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील आरोग्य विभागाने शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व्हेक्षण केले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे धडक मोहीम राबविण्यात आली. २०१७-१८ या वर्षात १२४ खाजगी दवाखान्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ८ संशयित वैद्यकीय व्यावासयिक आढळून आले. त्यापैकी ४ बोगस व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर उर्वरित चार जणांनी दवाखाना बंद करुन पोबारा केला. जिल्ह्यात ग्रमाीण भागामध्ये आणि काही प्रमाणात शहरी भागातही अशा प्रकारचे वैद्यकीय व्यवसाय होत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांचे सर्व्हेक्षण सुरु केले आहे. तीन वर्षात ९४ डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून संशयित खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या १०१ एवढी आहे. यापुढेही बोगस डॉक्टरांविरुद्धही मोहीम सुरु ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एम. शिंदे यांनी दिली.जिंतूरमध्ये सर्वाधिक संशयित डॉक्टर४जिल्हा प्रशासनाने मागील तीन वर्षात केलेल्या सर्व्हेक्षणात जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ५३ संशयित डॉक्टर आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार परभणी तालुक्यात ११, पूर्णा ४, पालम ३, सोनपेठ ३, पाथरी ६, मानवत १६ आणि गंगाखेड तालुक्यात ७ असे एकूण १०१ संशयित डॉक्टर या काळात आढळले आहेत.४ या संशयित डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रशासनाच्या या मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणुकीला आळा बसण्याची शक्यता आहे.जिल्हा, तालुकास्तरावर समित्या४२०१४-१५ पासून जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांची शोध मोहीम राबविली जात आहे. यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. २०१७-१८ मध्ये बोगस डॉक्टरांच्या संदर्भाने शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यात जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखान्यांची चेकलीस्टप्रमाणे तपासणी करण्यात आली होती.बोगस डॉक्टरांवर होणार कारवाई४जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात संशयित डॉक्टरांची शोध मोहीम सुरु ठेवली जाणार आहे. या अंतर्गत वैद्यकीय व्यवसायाचा परवाना उपलब्ध नसताना संबंधित व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करीत असेल तर त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३ (१) (२) अन्वये कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या मोहिमेमुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीHealthआरोग्यdoctorडॉक्टर