शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

परभणी : जात चोरीची भामटेगिरी अनेक वर्षांपासून सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:39 IST

येथील तहसील कार्यालयातील नोंदवहीत खाडाखोड करुन बनावट जात प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणातील जात चोरीची भामटेगिरी अनेक वर्षापासून सुरु असल्याचे पोलीस तपासात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होऊ लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील तहसील कार्यालयातील नोंदवहीत खाडाखोड करुन बनावट जात प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणातील जात चोरीची भामटेगिरी अनेक वर्षापासून सुरु असल्याचे पोलीस तपासात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होऊ लागले आहे.परभणी येथील तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन नोंदवहीत खाडाखोड करीत बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार ६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर अन्य दोघांना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील हे अत्यंत बारकाईने करीत आहेत.तपासामध्ये पोलिसांनी अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यामध्ये कोरे स्टॅम्प पेपर, जात प्रमाणपत्र, इतर सहायक कागदपत्रे, तहसीलदार यांच्या नावाचा शिक्का, रेशन कार्ड, निजामकालीन दस्ताऐवज आदींचा समावेश आहे. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील कागदपत्रेही संबंधित आरोपींकडे आढळले आहेत. या कागदपत्रांमध्ये ५ ते ६ वर्षापूर्वीचे देखील काही कागदपत्रे आढळली आहेत. त्यामुळे बनावट कागदपत्रे देऊन बनावट प्रमाणपत्र मिळवून लाभ पदरात पाडून घेत सुरु केलेला जात चोरीचा हा धंदा अनेक वर्षापासून सुरु असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. बनावट जात प्रमाणपत्र मिळवून काहींनी शासकीय नोकरी मिळविली, शिक्षणासाठी सवलत मिळविली, राजकीय लाभाची पदेही मिळविली असल्याची चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे. या प्रकरणात खाजगी व्यक्तींसह शासकीय कर्मचारी- अधिकारीही गुंतले असल्याने संबंधितांची नावे समोर आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्या दृष्टीकोनातून पोलीस तपास करीत आहेत.पोलिसांनी आतापर्यंत जवळपास २७ जणांना नोटिसा दिल्या आहेत. १५ जणांचे जबाब नोंदविले आहेत. त्यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी व्यक्ती आदींचा समावेश आहे. पोलीस तपासात नवनवीन माहिती समोर येत असल्याने आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.अत्यंत गोपनीय पद्धतीने पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात महिला कर्मचाºयांचेही जबाब घेतले जात आहेत.दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी४या प्रकरणात पोलिसांनी ६ नोव्हेंबर रोजी रात्री सय्यद अबरार इलाही व शेख शफाहेद शेख फारुख या दोन आरोपींना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्या. वैशाली पंडित यांनी दोन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अ‍ॅड. इम्तियाज खान यांनी आरोपी शफाहेद शेख यांच्या जामिनासाठी लगेचच अर्ज केला. त्यावर न्या.पंडित यांनी १९ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. आरोपी सय्यद अबरार इलाही यांच्या वतीने अ‍ॅड.भूतडा यांनी काम पाहिले.

टॅग्स :parabhaniपरभणीCaste certificateजात प्रमाणपत्र