शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ११ हजारांचा दर नळ जोडणीसाठी निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:41 IST

नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरवासियांना आता अकरा हजार रुपयांमध्ये नळजोडणी देण्याचा ठराव सोमवारी बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यामुळे शहरात लवकरच नव्या नळजोडणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरवासियांना आता अकरा हजार रुपयांमध्ये नळजोडणी देण्याचा ठराव सोमवारी बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यामुळे शहरात लवकरच नव्या नळजोडणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.केंद्राच्या युआयडीएसएसएमटी आणि राज्याच्या अमृत योजनेतून परभणी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून, या योजनेअंतर्गत नळ जोडणीसाठी मनपा प्रशासनाने ठरविलेले दर अवास्तव असल्याने या दरांना या मागील २ सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली नव्हती. हे दर निश्चित करुन नळजोडणी करण्यासाठी मनमाने २७ जानेवारी रोजी तातडीची विशेष सभा बोलावली होती. येथील बी.रघुनाथ सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता सभेला प्रारंभ झाला. महापौर अनिता सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त रमेश पवार, नगरसचिव विकास रत्नपारखे यांची प्रमुख उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीलाच उपमहापौर भगवान वाघमारे यांनी ठराव मांडला. नवीन पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. चाचण्याही गतीने पूर्ण केल्या जात आहेत. सध्या या योजनेचे पाणी शहरातील जलकुंभामध्ये आहे. जलकुंभामध्ये जास्त काळ पाणी साठवून ठेवणे योग्य नसल्याने नळ जोडणीचे दर निश्चित करण्याचा निर्णय त्वरीत घेणे गरजेचे आहे. इतर महानगरपालिकांमध्ये केलेली चर्चा आणि महाराष्टÑ शासनाच्या मान्यताप्राप्त असलेल्या महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने नळ जोडणीचे दरपत्रक महापालिकेला दिले आहे. त्यानुसार आयुक्त रमेश पवार यांनी हे दर निश्चित केले होते. त्यात सुरुवातीला पाईप, मीटर, खोदकाम आणि काँक्रीटीकरण करुन देण्यासाठी एजन्सीने १० हजार रुपये घेणे आणि महानगरपालिकेची अनामत रक्कम ४ हजार रुपये असा १४ हजार रुपयांचा दर निश्चित केला होता. नगरसेवकांनी त्यास विरोध केल्याने अनामत रक्कम २ हजार रुपये करण्यात आली. तसेच एजन्सीचे १ हजार रुपये कमी केले आहेत. त्यामुळे एजन्सीचे ९ हजार आणि अनामत रक्कम २ हजार असे ११ हजार रुपये नळजोडणीचा दर निश्चित करण्यात आला. या ठराव सभागृहासमोर मांडल्यानंतर नगरसेविका जयश्री खोबे, सचिन अंबिलवादे, विकास लंगोटे यांनी काही शंका उपस्थित केल्या. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी या ठरावास मंजुरी दिली.स्थळदर्शक नकाशा बंधनकारक करा४एजन्सीकडून स्थळदर्शक नकाशा घेतल्यास एकूण नळजोडणी, एकाच जागी किती नळजोडणी दिल्या, प्रत्यक्ष कुठे जोडणी दिली, त्यासाठी पाईप किती वापरला याची माहिती मनपाला मिळणार आहे.४शिवाय अवैध नळजोडणीचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे नळजोडणी देताना मनपा प्रशासनाने एजन्सीकडू स्थळदर्शक नकाशा घेणे बंधनकारक करावे, अशा सूचना उपमहापौर भगवान वाघमारे यांनी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी