शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : येलदरी धरणातील मत्स्य व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:55 IST

गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी वरदान ठरलेल्या येलदरी धरणात सहा वर्षांपासून पाणीसाठा होत नसल्याने येथील मत्स्य व्यवसायासाठी धोक्यात आला आहे़ यावर्षी या धरणात शून्य टक्के पाणीसाठा असल्याने मत्स्य व्यवसायात असलेल्या सुमारे दीड हजार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी) : गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी वरदान ठरलेल्या येलदरी धरणात सहा वर्षांपासून पाणीसाठा होत नसल्याने येथील मत्स्य व्यवसायासाठी धोक्यात आला आहे़ यावर्षी या धरणात शून्य टक्के पाणीसाठा असल्याने मत्स्य व्यवसायात असलेल्या सुमारे दीड हजार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे़येलदरी धरणात ५० वर्षांपासून मत्स्य व्यवसाय केला जातो़ या व्यवसायातून दीड हजारांहून अधिक कुटुंबियांचा चरितार्थ चालतो़ या धरणातील गोड्या पाण्यातील माशाला देशासह परदेशात मोठी मागणी आहे़ या धरणातील प्रॉन्स जातीच्या माशाला मोठी मागणी आहे. गोड्या पाण्यातील माशाबरोबरच झिंग्यामुळे देखील येलदरी धरणाची ओळख निर्माण झाली आहे़ मात्र मागील पाच - सहा वर्षांपासून निसर्गाची अवकृपा होत असल्याने येथील मत्स्य व्यवसाय अडचणीत आला आहे़धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत नसल्याने मुबलक पाणीसाठा होत नाही़ गतवर्षीपासून या धरणाची स्थिती अधिकच खालावली आहे. पुरेशे पाणी नसल्याने मत्स्य बीज सोडताना अडचणी येत आहेत़ त्यामुळे अपेक्षित मासेही उपलब्ध होत नाहीत़ धरणातील कमी होणारे पाणी अनेक व्यवसायांना अनेक चिंता निर्माण करणाऱ्या आहेत़ दरवर्षी पाणीसाठा कमी होत असल्याने मत्स्य बाजारपेठेत देखील शुकशुकाट दिसून येत आहे़ आगामी काळात चांगला पाऊस नाही पडल्यास येलदरी धरणावर मत्स्य व इतर व्यवसाय करून पोट भरणाºया हजारो नागरिकांना स्थलांतर करावे लागण्याची वेळ येऊ शकते़ तेव्हा यावर पर्याय उपलब्ध करण्यासाठी शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे़नदीजोड प्रकल्पात विचार व्हावा४येलदरी धरण हे मराठवाड्यासाठी वरदान ठरले आहे़ या धरणाने मत्स्य व्यवसाय, पिण्याचे पाणी व शेती सिंचनाचा प्रश्न मिटविला आहे़ त्यामुळे हे धरण शेतकऱ्यांसाठीही लाभदायक आहे; परंतु, दरवर्षी या भागात अवर्षण परिस्थिती निर्माण होत आहे़४त्यातच मत्स्य व्यवसाय करून उपजीविका भागविणाºया दीड हजार कुटुंबियांवर स्थलांतर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे़ मागील सहा वर्षांपासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मत्स्य व्यसायिक अडचणीत आहे. तेव्हा त्यामुळे शासनाने सुरू केलेल्या नदीजोड प्रकल्प योजनेत येलदरी धरणाचाही समावेश करावा, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणfishermanमच्छीमार