शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अखेर तलाठ्यांचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:43 IST

जिल्ह्यातील २ तलाठी व एका मंडळ अधिकाऱ्याचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेप्रमाणे स्थगित केले असल्याची माहिती परभणी जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत काजे यांनी दिली़ तसे पत्र जिल्हाधिकाºयांना बुधवारी देण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील २ तलाठी व एका मंडळ अधिकाऱ्याचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेप्रमाणे स्थगित केले असल्याची माहिती परभणी जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत काजे यांनी दिली़ तसे पत्र जिल्हाधिकाºयांना बुधवारी देण्यात आले़जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी परभणी येथील मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांना तर परभणीतील तलाठी लक्ष्मीकांत काजे, मांडवा येथील तलाठी शेख आयशा हुमेरा यांना उपविभागीय अधिकाºयांनी प्रशासकीय कामात अनियमितता केल्या प्रकरणी निलंबित केले होते़ जिल्हाधिकाºयांनी केलेली ही कार्यवाही अन्यायकारक असल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी ७ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते़ तत्पूर्वी ५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी तलाठी संघटनेला दिलेल्या पत्रात प्रशासनाची निलंबनाची कार्यवाही योग्यच असल्याचे सांगून कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा कायद्यांंतर्गत तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही प्रस्तावित केली जाईल, असा इशारा दिला होता़ या इशाºयास दाद न देता तलाठी व मंडळ अधिकाºयांनी सोमवार व मंगळवार असे दोन दिवस कामबंद आंदोलन केले़ तत्पूर्वी मंगळवारी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्याशी व नंतर अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाºयांनी चर्चा केली़ या संदर्भात माहिती देताना काजे म्हणाले की, विभागीय आयुक्तांनी या मुद्यांवर चर्चा केल्यानंतर दुष्काळ, निवडणूक आहे, असे सांगून मागण्या मान्य केल्या़ निलंबन रद्द करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या व इतर मागण्या मंजूर करून क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी वर्गास बायोमॅट्रिक प्रणालीबाबत सक्ती असणार नाही, असे मान्य केल्याने परभणी जिल्हा तलाठी संघाच्या वतीने केलेले आंदोलन स्थगित केले असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनास दिले असल्याचे काजे म्हणाले़ तलाठ्यांच्या मागण्यांचे तहसीलदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरण आंबेकर यांनी विभागीय आयुक्तांकडे समर्थन केले व क्षेत्रीय कर्मचारी- अधिकाºयांना बायोमॅट्रिक लागू होत नाही व ते शक्य नाही, असे सांगितले असल्याचे काजे म्हणाले़ मंगळवारी दुपारी औरंगाबादेत बैठक झाल्यानंतर व पाचही मागण्या मान्य केल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी प्रशासकीय कामांना सुरुवात केली, असे काजे यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनRevenue Departmentमहसूल विभाग