शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : स्वखुशीने जमिनी देऊनही शेतकरी नुकसानीचे धनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:08 IST

शासनाला स्वखुशीने जमिनी देणाºया शेतकºयांना जुन्या कायद्यानुसार मावेजा देण्यात आला. तर दुसरीकडे जमीन देण्यास विरोध करणाºया शेतकºयांना नव्या कायद्यानुसार अधिक मावेजा दिल्याने १०० हून अधिक शेतकºयांवर अन्याय झाला असून, कायद्यानुसार मावेजा द्यावा, या मागणीसाठी हे शेतकरी आता शासनाचे उंबरठे झिजवत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शासनाला स्वखुशीने जमिनी देणाºया शेतकºयांना जुन्या कायद्यानुसार मावेजा देण्यात आला. तर दुसरीकडे जमीन देण्यास विरोध करणाºया शेतकºयांना नव्या कायद्यानुसार अधिक मावेजा दिल्याने १०० हून अधिक शेतकºयांवर अन्याय झाला असून, कायद्यानुसार मावेजा द्यावा, या मागणीसाठी हे शेतकरी आता शासनाचे उंबरठे झिजवत आहेत.सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचा कालवा तयार करण्यासाठी परभणी तालुक्यातील संबर, पिंपळगाव टोंग आणि इतर गावांमध्ये जमिनी संपादित करण्यात आल्या. डाव्या कालव्यावरील वितरण प्रणालीसाठी जिल्हा प्रशासनाने जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु केल्यानंतर या भागातील सुमारे १२२ शेतकºयांनी या शासन कार्यास मदत करण्यासाठी विनाविलंब स्वत:च्या जमिनी उपलब्ध करुन दिल्या. परंतु, शासनाने याच शेतकºयांवर अन्याय केला. २०१३ मध्ये शासनाने नवीन भूसंपादन कायदा तयार केला. या कायद्यानुसार शासकीय कामासाठी जमीन संपादित केल्यास जमीन मालकाला बाजारभावाच्या तुलनेत पाच पट अधिक मावेजा दिला जातो. मात्र ज्या शेतकºयांनी सहकार्य केले, त्या शेतकºयांना प्रशासनाने २००९ च्या जुन्या कायद्यानुसार मावेजा देण्याची कार्यवाही केली. बाजार किंमतीप्रमाणे हा मावेजा शेतकºयांना वितरित करण्यात आला. तर दुसरीकडे ज्या शेतकºयांनी जमिनी दिल्या नाहीत. अशा शेतकºयांच्या जमिनी २०१३ च्या कायद्यानुसार ३ ते ४ पट अधिक किंमत देऊन शासनाने खरेदी केल्या.२०१३ मध्ये भूसंपादन कायदा तयार झाला असून या कायद्याची अंमलबजावणी २०१५ मध्ये झाली आहे. त्यामुुळे या कालावधीतील जमीन संपादनाची ही प्रक्रिया असल्याने अन्यायग्रस्त शेतकºयांना नवीन कायद्यानुसार मोबदला द्यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान शेतकºयांना सहन करावे लागत आहे. शासकीय कामकाजासाठी जमीन देऊनही नियमानुसार मोबदला दिला जात नसल्याने हे शेतकरी शासन दरबारी खेटे मारत आहेत. संबर येथील गजानन चव्हाण यांच्यासह बाबुराव चव्हाण, बाबाराव झाडे, कोंडाबाई झाडे अशा सुमारे १२२ शेतकºयांनी नव्या नियमानुसार वाढीव मावेजा द्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.कोºया बंधपत्रावर घेतल्या सह्याजमीन संपादित करताना जुन्या आणि नव्या कायद्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही बाब अधिकाºयांना यापूर्वीच माहीत होती. त्यामुळे ज्या शेतकºयांनी सहमतीने शासनाला जमिनी दिल्या, अशा शेतकºयांच्या कोºया बंधपत्रावर सह्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही बाबही शेतकºयांनी प्रशासनाकडे नमूद केली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता नवीन कायद्यानुसार शेतकºयांना जमिनीचा मोबदला वितरित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.