शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सोयाबीनने ओलांडली हमीभावाची सीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:43 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाहीर लिलावामध्ये सोयाबीनला सोमवारी ३४२६ रुपयांचा भाव मिळाला. शासनाने दिलेल्या हमीभावापेक्षा शेतमालाला जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाहीर लिलावामध्ये सोयाबीनला सोमवारी ३४२६ रुपयांचा भाव मिळाला. शासनाने दिलेल्या हमीभावापेक्षा शेतमालाला जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतकºयांच्या हाती खरीप व रबी हंगामातील पेरणी केलेली पिके पावसाअभावी येत नसल्याने शेतकरी दरवर्षी आर्थिक कोंडीत सापडत आहे. ज्यावर्षी शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळाले त्यावर्षी व्यापाºयांकडून शेतमाल कवडीमोल दर देऊन खरेदी केला जातो. त्यामुळे उत्पन्न होऊनही शेतकºयांच्या पदरी निराशाच येते, असा जिल्ह्याचा इतिहास आहे.यावर्षी जून व जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसावर जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरात नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाला यावर्षी फाटा देत शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली; परंतु, २० आॅगस्टनंतर बोरी परिसरात पाऊस झाला नाही. त्यामुळे बहुतांश शेतकºयांचे सोयाबीन पीक पावसाअभावी जागेवरच करपून गेले.ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध होते, त्या शेतकºयांनी सोयाबीनचे पीक घेतले; परंतु, शेतकºयांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाºयांकडून खरेदी केला जाऊ लागला. त्यामुळे शेतकºयांना दुष्काळात तेरावा महिना पाहण्याचीच वेळ येऊन ठेपली होती.जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात २६ नोव्हेंबर रोजी जाहीर लिलावाद्वारे सोयाबीनची खरेदी करण्यात आली. जाहीर लिलावाच्या वेळी सोयाबीनला केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या ३३९९ रुपयांच्या हमीभावापेक्षा अधिक ३४२६ रुपये प्रती क्विंटल भाव मिळाल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.३०० क्विटंल: सोयाबीनची खरेदी४जिंंतूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून बोरी बाजार समितीकडे पाहिले जाते. गेल्या काही दिवसांपासून शेतकºयांच्या शेतमालाला इतर बाजारपेठेपेक्षा जास्तीचा भाव मिळत असल्याने बोरी व परिसरातील शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीमधील मार्केटमध्ये विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत.४२६ नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या जाहीर लिलावामध्ये सोयाबीनला प्रती क्विंटल ३४२६ रुपयांचा हमीभाव मिळाला आहे. या एकाच दिवशी बाजारपेठेत ३०० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक चंद्रकांत चौधरी यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीagricultureशेती