शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रस्ता खोदल्याने १२०० एकर उसाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:34 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हादगाव ते नाथ्रा या रस्त्याचे काम सुरू असून हा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असल्याने हादगाव, नाथ्रा या परिसरातील १२०० एकरवरील उसाचा प्रश्न एैरणीवर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी )  : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हादगाव ते नाथ्रा या रस्त्याचे काम सुरू असून हा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असल्याने हादगाव, नाथ्रा या परिसरातील १२०० एकरवरील उसाचा प्रश्न एैरणीवर आला आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१७-१८ या वर्षात पाथरी तालुक्यातील हादगाव ते नाथ्रा गावापर्यंत ११.५ कि.मी. रस्त्याच्या कामाला आॅगस्ट २०१७ मध्ये मंजुरी मिळाली. या कामासाठी ५ कोटी ३४ लाखांचा निधीही उपलब्ध झाला. या रस्त्यावर पाथरगव्हाण बु., पाथरगव्हाण खु., जवळा झुटा, नाथ्रा ही गावे येतात. या गाव परिसरातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याच बरोबर या भागात जवळपास १२०० एकर उसाची लागवड करण्यात आली आहे. सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू असल्याने उसाची वाहतूक वाढली आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पाथरी-आष्टी रोडवरील हादगाव ते नाथ्रा या रस्त्याच्या कामास सहा महिन्यापूर्वी मान्यता मिळाली. संबंधित गुत्तेदाराने एका महिन्यापूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. त्याच बरोबर पहिल्या तीन कि.मी. अंतरात ठेकेदाराने हा रस्ता उखडून ठेवला असून त्यावर खडी अंथरली आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक या रस्त्याचे काम बंद केले आहे. खडी अंथरून रस्त्याचे काम बंद केल्यामुळे रस्त्यावरील रहदारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सध्या शेतकºयांच्या शेतातील उसाची तोडणी सुरू असून ऊस भरून ही वाहने या रस्त्यावरून जाताना वाहनांची टायरे घसरू लागल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हादगाव व नाथ्रा शेत शिवारातील १२०० एकरवरील उसाच्या वाहतुकीचा प्रश्न एैरणीवर आला आहे. त्यामुळे संबंंधित गुत्तेदाराने बंद केलेले रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे, अशी मागणी ऊस उत्पादकातून होत आहे.कालव्याच्या रस्त्याने करावी लागते वाहतूकहादगाव ते नाथ्रा या रस्त्यावर रहदारीची अडचण निर्माण झाल्याने या भागातील नागरिक पाथरीहून परत जात असताना वरखेड पाटीपासून जायकवाडीच्या कॅनॉलमार्गे पाथरगव्हाण खु., कासापुरी ते जवळा झुटा मार्गे नाथ्रा येथे जावे लागत आहे. दरम्यान, या रस्त्यासाठी एक वर्षाची मुदत असून सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत केवळ ३ कि.मी. रस्त्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण होईल की, नाही? याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.हादगाव- नाथ्रा या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेले काम गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक बंद पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर रहदारी करण्यास अडथळे निर्माण झाले असून दुचाकी वाहन सुद्धा गावापर्यंत नेता येत नाही. महामंडळाची बसही बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू करावे.-एकनाथ घांडगे,माजी जि.प. सदस्यरस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराला मुरूम उपलब्ध झाला नसल्याने सध्या रस्त्याचे काम बंद आहे.मात्र उखडलेल्या रस्त्यावर पाणी टाकून दबई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसात हे काम होईल.-सुनील बेंबळकर, उपअभियंता, मुख्यंमत्री ग्रामसडक योजना

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरी