शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : निकृष्ट कामामुळे ४८ लाख खर्चूनही रस्त्यावरील खड्डे जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:58 IST

शहराला जोडणाऱ्या तीन राज्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ४८ लाख रुपयांचा खर्च केला़ मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने तीनही रस्त्यांवरील खड्डे जैसे थे असल्याचे दिसत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): शहराला जोडणाऱ्या तीन राज्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ४८ लाख रुपयांचा खर्च केला़ मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने तीनही रस्त्यांवरील खड्डे जैसे थे असल्याचे दिसत आहे़राज्यातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवरून सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठल्यानंतर शासनाने डिसेंबरअखेरपर्यंत सर्व महामार्ग खड्डे मुक्त करण्याची घोषणा केली होती़ या अंतर्गत सेलू तालुक्यातून जाणाºया सेलू-देवगावफाटा, सेलू-पाथरी, सेलू-मानवत या तीन राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले़ हे काम करीत असताना डांबराचा कमी वापर करण्यात आला़ मोठी खडी टाकली नाही़ खड्डे बुजविण्यासाठी चुरीचा वापर अधिक प्रमाणात करण्यात आला़ त्यामुळे चारच महिन्यात तीनही राज्य रस्त्यावरील खड्डे पुन्हा जैसे थे झाले आहेत़ सेलू ते पाथरी रस्त्यावर कुंडी पाटीपर्यंत मोठ मोठे खड्डे पडले असून, वाहनधारक त्रस्त आहेत़ अशीच परिस्थिती इतर दोन महामार्गावरही आहे़ डिसेंबर महिन्यात हे खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ६४ लाख रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली होती़ मात्र प्रत्यक्षात ४८ लाख रुपयांचा निधी मिळाला़ हा निधीही खर्च करताना निकृष्ट पद्धतीने कामे करण्यात आले़ त्यामुळे रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत़ आता पुन्हा खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे़ सेलू ते मानवत रोड या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ मात्र यावेळीही डांबराचा वापर कमी केला जात असून, केवळ दगडाची चुरी भरून खड्डे बुजविले जात आहेत़ वाहतुकीमुळे ही चुरी रस्त्यावर पसरत आहे़ त्यामुळे काही महिन्यांतच खड्ड्यांची पूर्वीप्रमाणेच स्थिती होण्याची शक्यता आहे़ रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी शासनाकडून निधी मिळाला़ कामेही करण्यात आली; परंतु, खड्डे पाठ सोडत नसल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत़ सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरुपी उपाय करावेत, अशी मागणी होत आहे़खड्डे दुरूस्तीसाठी पुन्हा ८ लाखतिन्ही राज्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे ४० लाखांची मागणी केली होती; परंतु, शासनाकडून केवळ ८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खड्ड्यांची स्थिती पूर्वीप्रमाणेच नाही झाली तर नवलच !

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकfundsनिधी