शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वृक्षतोड वाढल्याने पर्यावरण धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:58 IST

जिल्ह्यात अल्पप्रमाणात असलेले वनक्षेत्र वाचविण्याच्या दृष्टीकोणातून प्रयत्न होणे आवश्यक असताना ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांना गांभीर्याची वाटत नसल्याने जिल्ह्याचे पर्यावरण धोक्यात आले आहे़ परिणामी जिल्ह्याच्या तापमानात यावर्षांत उच्चांकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात अल्पप्रमाणात असलेले वनक्षेत्र वाचविण्याच्या दृष्टीकोणातून प्रयत्न होणे आवश्यक असताना ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांना गांभीर्याची वाटत नसल्याने जिल्ह्याचे पर्यावरण धोक्यात आले आहे़ परिणामी जिल्ह्याच्या तापमानात यावर्षांत उच्चांकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे़परभणी जिल्ह्यात सद्यस्थितीत १०१़४८ चौरस किमी म्हणजेच जिल्ह्याच्या एकूण क्षेत्राच्या १़६२ टक्के वनक्षेत्र असल्याची २०१७ मध्ये शासन दरबारी नोंद आहे़ जिल्ह्यातील बहुतांश वनक्षेत्र हे जिंतूर तालुक्यातच आहे़ इतर तालुक्यांमध्ये मात्र हे वनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीकोणातून मागील काही वर्षामध्ये प्रयत्न झालेले नाहीत़परिणामी झाडांची बेसुमार कत्तल होत असल्याचे सातत्याने पहावयास मिळत आहे़ परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा फुले यांचा नियोजित पुतळा या दरम्यानची ३० ते ४० वर्षापूर्वीची झाडे शासनाच्या पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी रस्ता कामाच्या नावाखाली खाजगी व्यक्तींच्या माध्यमातून तोडली़ विशेष म्हणजे ही झाडे तोडण्याचे टेंडर काढण्यात आले नव्हते़ ही झाडे वाचविण्याच्या दृष्टीकोणातून पर्यावरण प्रेमींनी पुढाकारही घेतला होता; परंतु, प्रशासकीय पातळीवर उदासिनता दिसून आली़ शिवाय काहींनी त्यामध्ये खोडा घातला़त्यामुळे या झाडांची कत्तल झाली़ अशीच काहीशी परिस्थिती परभणी-गंगाखेड रस्त्यावर पहावयास मिळाली़ या रस्ता कामाच्या नावाखाली जवळपास ८० ते ९० वर्षांपूर्वीची वडाची व इतर झाडे सर्रासपणे तोडण्यात आली़ एक झाड तोडल्यानंतर त्या बदल्यात किमान पाच झाडे लावून त्याचे संगोपन करावे, असा नियम असताना निगरगट्ट झालेल्या अधिकाºयांनी याकडे लक्षच दिले नाही़परिणामी एकेकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी असलेल्या झाडांमुळे हिरवागर्द दिसणारा हा रस्ता आता मात्र ओसाड झाल्याचे दिसून येत आहे़ या रस्त्यावरील झाडे तोडतानाही पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नाही़ तशी विचारण्याची तसदीही घेण्यात आली नाही़ परभणी-पाथरी व परभणी-जिंतूर रस्त्याच्या कामासाठीही अशीच काहीशी परिस्थिती पहावयास मिळाली़ जिल्हास्तरावर पर्यावरण समिती स्थापन करण्यात आलेली आहे़ परंतु, या समितीची बैठक कधी होते आणि काय निर्णय होतात? हेही कधी समोर आलेले नाही़ त्यामुळे ही समिती कागदावरच आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे़ रस्ता कामांसाठी एकीकडे झाडांची कत्तल सुरू असताना दुसरीकडे जिंतूर तालुक्यातील इटोली या एकमेव जंगल क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या झाडे तोडली जात असल्याचे गेल्या महिन्यात ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणी दरम्यान दिसून आले होते़ त्यानंतरही वन विभागाला या प्रकरणी कारवाई करावीशी वाटली नाही़झाडांची कमी होत असलेल्या संख्येमुळे जिल्ह्याच्या तापमानही मोठी वाढ झाली आहे़ २९ एप्रिल रोजी जिल्ह्याचे तापमान सर्वोच्च म्हणजे तब्बल ४७ अंश एवढे झाले होते़ आतापर्यंतचे परभणीच्या इतिहासातील हे उच्चांकी तापमान असल्याने आतातरी परभणीकरांना जाग येईल आणि पर्यावरण रक्षणासाठी परभणीकर सरसावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीforestजंगलTemperatureतापमान