शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अवैध वाळू उपसा करताना गंगाखेड येथे एकास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 01:03 IST

गोदावरी नदीपात्रातून गाढवांच्या माध्यमातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या एकास स्वत: जिल्हाधिकाºयांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केले. यावेळी गाढव मात्र फरार झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुळी येथील बंधाºयाजवळ घडली. या प्रकरणी गाढव मालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : गोदावरी नदीपात्रातून गाढवांच्या माध्यमातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या एकास स्वत: जिल्हाधिकाºयांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केले. यावेळी गाढव मात्र फरार झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुळी येथील बंधाºयाजवळ घडली. या प्रकरणी गाढव मालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंगाखेड तालुक्यातून वाहणाºया गोदावरी नदीपात्रातील वाळू धक्यांचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे प्रत्येक वाळू धक्याच्या ठिकाणाहून गाढव, ट्रॅक्टरच्या माध्यमातून दिवसा व रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळुचा उपसा सुरूच असल्याचे महसूल प्रशासनाकडून होत असलेल्या कार्यवाहीतून दिसून येत आहे. यापूर्वी गंगाखेड शहराजवळील धारखेड येथील गोदावरी नदीपात्रातून गाढवांच्या माध्यमातून अवैधरित्या वाळू उपसा केला जात असताना तहसीलदार स्वरुप कंकाळ, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी शिवाजी मुरकुटे, चंद्रकांत साळवे यांच्या पथकाने दोनवेळा केलेल्या कार्यवाहीत एकदा २६ तर दुसºयांदा ७ अशी ३३ गाढवे ताब्यात घेत जप्तीची कार्यवाही केली होती.अवैधरित्या वाळू उपसा करणारे गाढव महसूल प्रशासनाने ताब्यात घेतल्यानंतर गाढवांचे मालक मात्र फरार होण्यात यशस्वी होत होते. ३१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिवशंकर हे परभणीहून पालमकडे जाण्यासाठी गंगाखेडकडे येत असताना मुळी बंधाºयाला भेट दिली.तेव्हा एक इसम दहा गाढवांच्या माध्यमातून वाळू उपसा करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी जिल्हाधिकाºयांनी वाळू उपसा करणाºया शेख मासूम शेख खलील (रा.सारडा कॉलनी, गंगाखेड) यास पकडून गाडीमध्ये टाकले. त्यानंतर गंगाखेड पोलिसांच्या ताब्यात दिले.त्यानंतर तालुका महसूल प्रशासनाला मुळी बंधाºयाजवळील गोदावरी नदीपात्रातील वाळुचा पंचनामा करण्याचे आदेश दिले. तेव्हा अधिकाºयांनी केलेल्या पंचनाम्यानुसार ७४ हजार रुपये किंमतीची २० ब्रॉस वाळू चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यावरून मुळी सज्जाचे तलाठी सतीश मुलगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख मासून शेख खलील (वय ३५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हरिभाऊ शिंदे, दत्तराव पडोळे, रामकिशन कोंडरे हे करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू