शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : टँकरचे नियोजन नसल्याने टंचाईत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:39 IST

शहरातील यशोधननगर, रविराज पार्क भागात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ मनपाने या भागासाठी केवळ एका टँकरचे नियोजन केले असून, हे टँकरही नियमित येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील यशोधननगर, रविराज पार्क भागात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ मनपाने या भागासाठी केवळ एका टँकरचे नियोजन केले असून, हे टँकरही नियमित येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़शहरातील जायकवाडी परिसरात यशोधननगर असून, याच भागात रविराज पार्क पार्वतीनगर ही वसाहत आहे़ दोन्ही वसाहतींमध्ये साधारणत: एक ते दीड हजार कुटूंबिय वास्तव्याला आहेत़ या दोन वसाहतींबरोबरच या परिसरातील इतर वसाहतींसाठी महापालिकेने केवळ एका टँकरचे नियोजन केले आहे़ टँकरचे पॉर्इंटही नेमून दिले आहेत; परंतु, टँकर येण्याची वेळ निश्चित नसल्याने येथील नागरिकांची तारांबळ होते़ यशोधननगर भागात १० दिवसानंतर बुधवारी टँकर दाखल झाले़ त्यामुळे टँकरचे पाणी भरून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ झाल्याचे पहावयास मिळाले.यशोधननगर परिसरामध्ये जलवाहिनी टाकली आहे; परंतु, या जलवाहिनीला जोडणी दिली नाही़ लोकमान्यनगर भागातील मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व्ह टाकल्यानंतर नळाद्वारे यशोधननगराला पाणी उपलब्ध होऊ शकते़ महापालिकेने पुढाकार घेतला तर या भागातील पाण्याची समस्या निकाली निघू शकते़; परंतु, जलवाहिनी टाकूनही अद्याप पाणीपुरवठा सुरू केला नसल्याने येथील नागरिकांना टंचाईचा सामन करावा लागत आहे़ नळ योजना नाही, हातपंपांचे पाणी आटले आहे़ अशा परिस्थितीत या नागरिकांची संपूर्ण भिस्त टँकरच्या पाण्यावर आहे; टँकरही बेभरोस्याचे असल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत़ नियमित टँकर येत नाही़ पाणी संपल्यानंतर नगरसेवकांकडे पाठपुरावा करावा लागतो़ त्यानंतर कुठे टँकरचे पाणी मिळत आहे़ मनपाने या भागात जलवाहिनीचे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि येथील समस्या निकाली काढावी, अशी नागरिकांची मागणी आहे़ याच परिसरातील रविराज पार्क, पार्वतीनगर या भागाचीही अशीच समस्या आहे़ रविराज पार्क परिसरात जलकुंभ उभारणीचे काम सध्या सुरू आहे़ विशेष म्हणजे, या भागातही महापालिकेने जलवाहिनी टाकली आहे़ मात्र या जलवाहिनीला पाणी उपलब्ध करून दिले नाही़परिणामी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ मार्च महिन्यामध्येच रविराज पार्क भागातील हातपंप आटले आहेत़ या भागातही सहा ते सात दिवसांतून एक वेळा टँकरचे पाणी येत असून, सुमारे १ हजार कुटूंबियांसाठी केवळ १२ हजार लिटरचे एकच टँकर पाठविले जाते़ या टँकरच्या दिवसभरातून पाच फेऱ्या होत असल्या तरी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही़ एका वेळेला केवळ ५०० लिटर पाणी मिळते़ हे पाणी जास्तीत जास्त दोन दिवस पुरते़ त्यामुळे मनपाने टँकरची संख्या वाढवावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे़जलकुंभावर जाऊन आणावे लागते टँकर४यशोधननगर, रविराज पार्क या दोन्ही भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे़ मनपाच्या टँकरचे नियोजन नाही़ पाणी संपल्यानंतर नगरसेवकांकडे पाठपुरावा केला जातो़ थेट पाण्याच्या टाकीवर जाऊन एक जण टँकरसोबत दिल्यासच ते टँकर वसाहतीपर्यंत पोहचते आणि तेव्हा कुठे नागरिकांना पाणी उपलब्ध होते़ प्रत्येक वेळी अशाच प्रकारे पाठपुरावा केल्यानंतरच टँकर मिळते़ त्यामुळे टंचाईत भर पडली आहे़४महापालिकेचे टँकरचे नियोजन नसल्यानेच परिसरामध्ये पाण्याची समस्या तीव्र झाली आहे़ टँकरच्या सहाय्याने किमान तीन दिवसांआड मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला तर नागरिकांची समस्या दूर होऊ शकते़; परंतु, हे नियोजन विस्कळीत असल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़४टँकरच्या सहाय्याने मिळणारे पाणी सांडपाण्यासाठी वापरले जाते़ पिण्यासाठी मात्र विकतच्या पाण्यावरच येथील नागरिकांची भिस्त आहे़ त्यामुळे टंचाई परिस्थितीमध्ये पाण्यावरील खर्च वाढला आहे़ प्रभागात टँकर पोहचल्यानंतर पाणी वितरित करीत असताना अनेक नागरिकांपर्यंत पाणी पोहचत नाही़ त्यामुळे पाण्यावरून वादाचेही प्रकार घडत आहेत़ मनपाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे़मागील महिनाभरात टँकरने केवळ तीन वेळा पाणी मिळाले़ १० दिवसांतून एक वेळा टँकर येत असल्याने पाण्यासाठी ओढाताण होत आहे़ या भागातील बोअर आटल्याने पाणीटंचाई वाढली आहे़ मनपाने टँकरची संख्या वाढवावी़-रामचंद्र शिंदे, नागरिकबोअरचे पाणी आटले असून, १५-१५ दिवस टँकरचे पाणी मिळत नाही़ आमच्या भागात नळ नाहीत़ त्यामुळे पाणी संपल्यानंतर दूर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत आहे़ मागील काही दिवसांपाूसन ही परिस्थिती निर्माण झाली आहे़-शिवनंदा मिरसगावे, नागरिक१५ दिवसांपर्यंत टँकर येत नाही़ नळ योजना नसल्याने पाण्याची खूपच समस्या निर्माण झाली आहे़ या भागात जलकुंभाचे काम सुरू आहे़ ते पूर्ण करून जलवाहिनीच्या माध्यमातून परिसराला त्वरित पाणी उपलब्ध करून द्यावे़-मीनाबाई चव्हाण

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई