शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

परभणी: भाव घसरल्याने कापूस उत्पादक झाले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:19 IST

कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरताना दिसत आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५४९० रुपये वरचा दर मिळाला. कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरताना दिसत आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५४९० रुपये वरचा दर मिळाला. कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.यंदा तालुक्यात पाऊस कमी झाल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तर १ ते २ क्विंटलवरच समाधान मानावे लागले. पाण्याची सुविधा असणाºया शेतकऱ्यांनाही अपेक्षेप्रमाणे कापसाचे उत्पादन मिळाले नाही.यावर्षी कमी उत्पादन असल्याने कापसाचे भाव तेजीत राहातील, अशी आशा शेतकºयांना लागली होती. मात्र मागील आठवडाभरापासून कापसाचे भाव कमी होत असल्याने शेतकºयांना चिंता लागली आहे. यावर्षी खरीप हंगामात तालुक्यातील २२ हजार २२८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. गतवर्षी पेक्षा २ हजार हेक्टरवर जास्त कापसाची लागवड झाली होती. पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने कृपा केल्याने शेतकरी समाधानी होते. कापसाचे उत्पादन वाढेल असे वाटत असतानाच पावसाने दीड महिन्याचा खंड दिल्याने शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले गेले.कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली. तसेच रासायनिक खताच्या व कीटकनाशकांच्या वाढलेल्या किंमतीमुळे तसेच कापूस वेचणीच्या वाढत्या मजुरीमुळे आजच्या भावात कापूस विकण्याच्या मन:स्थितीत उत्पादक नसल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत बाजार समितीच्या यार्डात कापसाची आवक वाढली आहे. सुरुवातील ६ हजार रुपये दर मिळाल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र त्यानंतरच्या काळात ५७०० ते ५८०० या दरावर भाव स्थिरावले होते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कापसाचे भाव वाढतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. त्यामुळे भाव वाढल्यानंतर कापूस विक्री करण्यावर बहुतांश शेतकरी ठाम होते. ज्या शेतकºयांना ४ ते ५ क्विंटल कापूस झाला आहे. असेच शेतकरी पैशांच्या चणचणीमुळे भाववाढीची वाट न बघता आपला कापूस विक्री करुन मोकळे झाले आहेत. मात्र ज्या शेतकºयांना जास्तीचे उत्पादन झाले, अशा शेतकºयांनी दरवाढ होईल, या आशेने कापूस घरात ठेवला होता. या शेतकºयांची अशा फोल ठरली आहे. २७ फेब्रुवारी रोजी बाजार समितीच्या लिलावात कापसाला वरचा दर ५४९० रुपये मिळाला.मागील आठवडाभरात कापासाच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.शासकीय सेवेत समाविष्ट करावे, या मागणीसाठी बाजार समितीचे सर्व कर्मचारी २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. राज्य बाजार समिती संघाने आपले आंदोलन मागे घेतल्याने ५ मार्चपासून बाजार समितीत कापासाचा लिलाव सुरु होत असल्याची माहिती बाजार समितीने काढलेल्या परिपत्रकात दिली आहे. शेतकºयांनी आपला कापूस परस्पर न विक्री करता लिलावात विक्री करावा, असे अवाहन सभापती गंगाधरराव कदम, उपसभापती पंकज आंबेगावकर, प्रभारी सचिव शिवनारायण सारडा यांनी केले आहे.खाजगी व्यापाºयांना प्राधान्यकापूस लिलावात सीसीआयकडून खरेदी करण्यात येत आहे. १५ हजार क्विंटल कापूस आतापर्यंत खरेदी केला आहे. शासकीय हमीभाव ५४५० प्रती क्विंटल आहे. सीसीआयकडून मिळणाºया हमीभावापेक्षा खाजगी व्यापाºयांकडून मिळणारा भाव जास्त असल्याने व रोख रक्कम मिळत असल्याने शेतकरी खाजगी व्यापाºयांना कापूस विक्री करण्यासाठी पसंती देत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूस