शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : चारा मिळेना; उसाच्या वाढ्यांना आला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:25 IST

तीन वर्षांपासून सातत्याने पाऊस कमी होत असल्याने शेती उत्पादनात मोठी घट झाली असून तालुक्यातील ८८ हजार २९१ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक उसाचे वाढे चारा म्हणून वापरत आहेत.

अतूल शहाणे।लोकमत न्यूज नेटवर्कपुर्णा (परभणी) : तीन वर्षांपासून सातत्याने पाऊस कमी होत असल्याने शेती उत्पादनात मोठी घट झाली असून तालुक्यातील ८८ हजार २९१ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक उसाचे वाढे चारा म्हणून वापरत आहेत.पूर्णा तालुक्यातील बहुतांश भागात यावर्षी रबी पेरणी झाली नाही. जायकवाडी प्रकल्पाचे पाणी कालव्याला सुटल्याने अत्यल्प प्रमाणात पेरणी झाली आहे. परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत ओलावा शिल्लक नाही. परिणामी रबी हंगामातील गहू, ज्वारी ही महत्त्वाची पिके हातची गेली आहेत. उन्हाळा सुरू होत असताना शहरी व ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेत शिवारात जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही.पंचायत समितीतून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील ९५ गावांत ४५ हजार ४०० गाय वर्ग, १५ हजार ९६१ म्हैसवर्ग, २२ हजार ३४७ शेळ्या, ४ हजार ५०८ मेंढ्या तर ४१ घोडे अशी जनावरांची संख्या आहे. पाऊस थांबल्यापासून शेतात असलेल्या हिरव्या चाऱ्यानंतर सोयाबीनच्या गोळीचा वापर चारा म्हणून सुरू झाला. त्यानंतर आता उसाचे वाढे चाºयासाठी पर्याय ठरत आहेत. सद्य स्थितीत ऊस साखर कारखान्यावर पाठविला जात आहे. त्यामुळे वाढे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. पावसाळी हायब्रीड ज्वारी व हिवाळी टाळकी ज्वारीचे पीक उपलब्ध नसल्याने उसाच्या वाढ्याला भाव आला आहे. तालुक्यात चारा टंचाई गंभीर होत असून पशूपालकांना चाºयाची चिंता लागली आहे.चाºयासाठी बियाणे वाटप४पंचायत समितींतर्गत येणाºया सात पशुवैद्यकीय केंद्रात मागील पंधरवड्यात चारा उपयोगी बियाणे वाटप करण्यात आले. विविध योजनेंतर्गत मका व संकरित ज्वारीचे ११९० कि.ग्रॅम बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले आहे, असे असले तरी पाणी उपलब्ध नसल्याने हे बियाणे उगवतील की, नाही, या विषयी शंका निर्माण होत आहे.पशुधनाची बाजारात विक्री४चाºयाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन बहुतांश शेतकºयांनी आपले पशुधन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. चारा नाही, पाणी नाही, त्यामुळे जनावरे कशी जोपासावीत, असा भावनिक सवाल शेतकरी करीत आहेत.परिणामी जनावरांच्या बाजारामध्ये मोठ्या संख्येने जनावरे विक्रीसाठी येत आहेत.‘चारा छावण्या सुरू करा’तालुक्यात चाºयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्रशासनाने या संदर्भात प्राधान्याने विचार करून आगामी काही दिवसात चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी राकाँचे तालुकाध्यक्ष शहाजी देसाई यांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी