शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जिल्ह्याची नजर आणेवारी ५४ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:59 IST

खरीप हंगामातील पीक उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी येत असून, महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील ८४९ गावांचे सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिल्ह्याची पैसेवारी ५४.२४ टक्के निघाल्याचा अहवाल २९ सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे नजर आणेवारीत जिल्ह्यातील उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाल्याने आता सुधारित आणि अंतिम आणेवारीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामातील पीक उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी येत असून, महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील ८४९ गावांचे सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिल्ह्याची पैसेवारी ५४.२४ टक्के निघाल्याचा अहवाल २९ सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे नजर आणेवारीत जिल्ह्यातील उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाल्याने आता सुधारित आणि अंतिम आणेवारीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात खरीप आणि रबी हे दोन महत्त्वाचे हंगाम असून, या हंगामात निघालेल्या उत्पादनावर येथील आर्थिक व्यवहार अवलंबून असतात. या दोन्ही हंगामात महसूल प्रशासनाकडून पैसेवारी काढून झालेल्या उत्पादनाचा लेखाजोखा घेतला जातो. यापूर्वी या आणेवारीवरुनच दुष्काळाचेही मूल्यमापन केले जात होते. २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ८४९ गावांमध्ये महसूल प्रशासनाने सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिंतूर तालुक्याची सर्वात कमी ५२ पैसे आणि पाथरी तालुक्यातील ५२.८५ पैसे आणेवारी निघाली आहे. इतर तालुक्यांची नजर आणेवारीही ५२ ते ५७ पैशांच्या आसपास आहे.जिल्ह्यातील प्राथमिक नजर आणेवारी ५४.२४ पैसे निघाल्याने परभणी जिल्ह्यातील दुष्काळाच्या मदतीवरही पाणी फेरले गेले आहे. यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबिन, कापूस, तूर, मुग ही महत्त्वाची पिके घेतली गेली. कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय सोयाबिन पिकावही रोगाचा प्रादुर्भाव आहे. तब्बल दीड महिन्यापासून पाऊस गायब झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने एकीकडे पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत असताना दुसरीकडे महसूल प्रशासनाने काढलेली नजर पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाली आहे.सुधारित आणि अंतिम आणेवारीत या पैसेवारी किती फरक पडतो, यावरच शासकीय मदतीचे गणित अवलंबून राहणार आहे.सर्व गावे ५० पैश्यांपेक्षा अधिकमहसूल प्रशासनाने काढलेल्या नजर आणेवारीत एकाही गावात ५० पैश्यांपेक्षा कमी पैसेवारी निघालेली नाही. सर्वच्या सर्व गावांमध्ये ५० पैश्यांपेक्षा अधिक पैसेवारी निघाल्याने आता सुधारित आणेवारीत काय बदल होतो, याकडे लक्ष लागले आहे. सध्या गावा-गावात पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगानंतरच सुधारित आणेवारी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे सुधारित आणेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभाग