शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा क्रीडा संकुलाला तलावाचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:28 IST

उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलाची प्रशस्त जागेत उभारणी करण्यात आली़ या ठिकाणी खेळाडू दररोज सरावासाठी येतात़ परंतु, पावसाळ्यात जिल्हा क्रीडा संकुलात पाणी साचून तळ्याचे स्वरुप येत असल्याने खेळडूंमधून संताप व्यक्त होत आहे़ मागील अनेक वर्षांपासून ही समस्या असल्याने जिल्हा क्रीडा प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेतच दिसून येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलाची प्रशस्त जागेत उभारणी करण्यात आली़ या ठिकाणी खेळाडू दररोज सरावासाठी येतात़ परंतु, पावसाळ्यात जिल्हा क्रीडा संकुलात पाणी साचून तळ्याचे स्वरुप येत असल्याने खेळडूंमधून संताप व्यक्त होत आहे़ मागील अनेक वर्षांपासून ही समस्या असल्याने जिल्हा क्रीडा प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेतच दिसून येत आहे़महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आली़ या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुलावर देखरेख, दुरुस्ती व सोयी सुविधांची जबाबदारी निश्चित करण्यात आली़ राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या क्रीडा उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करणे आदी या कार्यालयावर जबाबदारी देण्यात आली़ परंतु, परभणी येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने केवळ बघ्याचीच भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे राज्य, देश पातळीवर खेळण्यासाठी जिल्ह्यातून जाणाºया खेळाडूंची संख्या बोटावरच मोजण्या इतकी आहे़ त्याचबरोबर शहरासह जिल्ह्यातील कानाकोपºयातून जिल्ह्याच्या या क्रीडा संकुलात सराव करण्यासाठी सकाळी व सायंकाळी या दोन सत्रात खेळाडू येत असतात़ परंतु, जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था पाहून खेळाडूंमध्ये उत्साह संचारण्याऐवजी निराशेला सामोरे जावे लागत आहे़ मागील अनेक वर्षांपासून या जिल्हा मैदानात पावसाळा सुरू झाला की मोठ्या प्रमाणात पाणी साचते़ मैदानात साचणाºया पाण्याचा निचरा करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने अनेक वेळा लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला़ परंतु, अद्यापपर्यंतही जिल्हा क्रीडा संकुलातील पाण्याचा निचरा झाला नाही़ शुक्रवारी शहरात झालेल्या पावसामुळे या जिल्हा क्रीडा संकुलाला तळ्याचे स्वरुप आले होते़ खेळाडुंची गैरसोय झाली़ परंतु, याकडे लक्ष देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास वेळच मिळत नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी या क्रीडा संकुलातील सोयी, सुविधांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी खेळाडूंमधून होत आहे़विभागीय आयुक्तांच्या आदेशाला दिला खो४तत्कालीन क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर हे जिल्हा दौºयावर आल्यानंतर त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली होती़ या संकुलात असलेल्या गैरसोय व अस्वच्छतेबाबत तत्कालीन क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांची चांगलीच कानउघडाणी केली होती़ त्यानंतर शहरातील खेळाडूंसाठी महिनाभरात ट्रॅक उभारण्याचे आदेश दिले होते़४परंतु, आदेश देवून वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरी क्रीडा विभागाने आयुक्तांच्या आदेशाला गांभिर्याने घेतले नाही़ अद्यापही रनिंग ट्रॅकचे काम पूर्णत्वास आले नाही़ त्यामुळे एक प्रकारे या क्रीडा विभागाने आयुक्तांच्या आदेशाला खो दिल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे विभागीय आयुक्तांनी खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे़पत्र्यांचीही झाली दुरवस्थाजिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या खेळाचा आनंद घेण्यासाठी उभारण्यात आलेल्या गॅलरीचे पत्रे पूर्णत: खराब झाले आहेत़ काही वादळी वाºयात उडून गेले आहेत़या पत्रांची दुरुस्ती करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करून केवळ लाल माती आणे, मैदानावर टाकणे एवढ्यावरच भर दिला जातो़ या व्यतिरिक्त काहीही नवीन होत नाही़त्याचबरोबर थोडासा पाऊस झाल्यास मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते़ या पाण्याचा निचरा करण्यासाठीही या विभागाकडून ठोस पावले उचलण्यात येत नाहीत़कोणत्या सुविधा तर उपलब्ध होतच नाहीत़ त्यातच जिल्हा क्रीडा संकुलात अनेक ठिकाणी कचरा आढळून येतो़ त्यामुळे खेळाडूंंना अस्वच्छतेचा नाहक त्रास होतो़लाखोंचा निधी खर्च; सुविधा मिळेनातजिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व मैदान चांगले ठेवण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी क्रीडा विभागाने वतीने खर्च करण्यात येतो़परंतु, ना खेळाडुंना सुविधा मिळतात, ना मैदान चांगले होते़ त्यामुळे या सर्व प्रकाराची जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी चौकशी करून खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस