शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा कचेरीवर धडकला भटक्या विमुक्तांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 00:51 IST

राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची शासकीय मदत द्यावी, भटक्या विमुक्तांसाठी तिसरी सूची तयार करावी, या प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या. शहरातील शनिवार बाजार येथून दुपारी १२ वाजेच्या सुमारास या मोर्चाला प्रारंभ झाला. जोशी समाज, गोसावी समाज, डवरी गोसावी समाज, सिकलकरी समाज, वैंदू समाज, बहुरुपी, गारुडी समाज, कैकाडी समाज, जोगी समाज आदी भटक्या समाजातील महिला, पुरुष पारंपारिक वेषभूषेत मोर्चात सहभागी झाले होते. भटक्या विमुक्तांना न्याय मिळालाच पाहिजे, राईनपाडा घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.शनिवार बाजार, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायणचाळ, विसावा कॉर्नर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलनस्थळी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धर्मराज चव्हाण, भगवान भोळे, ज्ञानेश्वर भोसले, बाबासाहेब भोसले, गोविंद सरवदे, रामेश्वर भोळे, पंडित भोसले, दिलीप हरगावकर, मदन नरवाडे, अशोक नरवाडे, रेड्डीसिंग बावरी, आनंद वंजारी, सटवाजी भोळे, साधनाताई राठोड आदींनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. राईनपाडा सारख्या घटना यापुढे घडू नयेत, यासाठी समाजाने काळजी घ्यावी, शिक्षणाची कास धरावी, संघटीत होऊन आपले हक्क मिळवावेत, असे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सत्ता ताब्यात घ्या : आंबेडकरभारिप-बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, परंतु भटक्या विमुक्तांचे पुनर्वसन झाले नाही. राज्यकर्त्यांना भटक्या समाजाविषयी आस्था नसल्यानेच हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आता न्याय मिळण्याचीही अपेक्षा नाही.समाजाला विकासाच्या मार्गावर आणयचे असेल तर सत्ता मिळविणे हा एकच पर्याय आहे. त्यामुळे मताचा योग्य वापर करुन सत्ता काबीज करा. त्यासाठी संघटित व्हा, सत्ता ताब्यात असेल तरच आपले प्रश्न सुटतील, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. यावेळी लक्ष्मणराव माने यांनीही आंदोलकांना मार्गदर्शन केले. महापौर मीनाताई वरपूडकर यांनीही आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

टॅग्स :parabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीMorchaमोर्चा