शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी जिल्हा कचेरीत बैठक : ३३५५ कोटींच्या वार्षिक आराखड्यास दिली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:18 IST

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ३३५५़६२ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्यास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी मंजुरी दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ३३५५़६२ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्यास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी मंजुरी दिली आहे़जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक राम खरटमल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखडा सादर केला़ त्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ४६५़५६ कोटी रुपयांची (१६ टक्के) वाढ करण्यात आली़ यावर्षी खरीप व रबी हंगामात मिळून एकूण १७८३़९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ यात खरीप पीक कर्जासाठी १४७०़४४ कोटी रुपये तर रबी हंगामातील पीक कर्जासाठी ३१३़३४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक कर्जासाठी १०२ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे़ त्यामध्ये व्यापारी बँकांसाठी १३११़९४ कोटी तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी २३१़९६ कोटी आणि परभणी जिल्हा बँकेसाठी २४०़१ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे़ जिल्हास्तरीय तांत्रिक समिती व राज्यस्तरीय बँकर्सच्या वतीने २०१८-१९ या सालाकरिता पीक कर्ज दर निश्चित करण्यात आले असून, या पीक कर्जाच्या दरात १० टक्के वाढ करण्यात आली आहे़यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, नाबार्डचे व्यवस्थापक प्रीतम जंगम, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक सहस्त्रबुद्धे, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक कुरूंदकर, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक संदीप अच्छा आदींची उपस्थिती होती़गतवर्षीच्या तुलनेत अधिक तरतूदजिल्ह्यातील शेतीवर आधारित उद्योगांसाठी कर्जाची जास्त मागणी असल्याने गतवर्षीपेक्षा यावर्षी अधिक तरतूद करण्यात आली आहे़ यात प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, रेशीम उद्योग, फळबागा, फूलबागा, शेडनेट, पॉलीहाऊस, शेती सुधारणा, शेततळे, विहीर, मोटार व अन्य बाबींचा समावेश आहे़ शासनाच्या व बँकांच्या विविध कर्ज योजनांंतर्गत उद्योग, व्यवसायाकरीता ९३३़७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण व शहरी भागातील गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना, स्टँडअप इंडिया कर्ज योजना, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग महामंडळ तसेच इतर महामंडळांमार्फत वाटप करण्यात येणाऱ्या विविध योजनांचा समावेश आहे़४नवीन उद्योग निर्मितीसाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली आहे़ पंतप्रधान मुद्रा लोण योजनेसाठी यावर्षी प्रत्येक बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे़ जिल्हा अग्रणी बँकेचे राम खरटमल यांनी सादर केलेल्या या आराखड्यास यावेळी मंजुरी देण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीBudgetअर्थसंकल्प