शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जिल्हाधिकाऱ्यांची वाळूघाटावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:59 IST

गोदावरी नदीच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिवशंकर चक्क रुग्णवाहिकेतून नदीच्या घाटावर पोहोचल्यानंतर अवैध वाळू उपसा करणाºया ट्रॅक्टरचालकांनी धूम ठोकली. एक ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाने ट्रॉली जागेवरच सोडून पळ काढला. ही ट्रॉली प्रशासनाने जप्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : गोदावरी नदीच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिवशंकर चक्क रुग्णवाहिकेतून नदीच्या घाटावर पोहोचल्यानंतर अवैध वाळू उपसा करणाºया ट्रॅक्टरचालकांनी धूम ठोकली. एक ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाने ट्रॉली जागेवरच सोडून पळ काढला. ही ट्रॉली प्रशासनाने जप्त केली आहे.गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून रात्रंदिवस वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. तालुक्यातील वाळू धक्यांचा लिलाव झालेला नसताना गंगाखेड शहर परिसरासह महातपुरी, गौंडगाव, मैराळ सावंगी आदी ठिकाणाहून सर्रास वाळूचा उपसा होत आहे. विनापरवाना आणि अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारी थेट जिल्हाधिकाºयांकडेच करण्यात आल्या.या तक्रारींची दखल घेऊन १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ च्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिवशंकर हे रुग्णवाहिकेतून थेट महातपुरी येथील गोदावरी घाटावर पोहोचले. जिल्हाधिकारी वाळू घाटावर आल्याचे पाहून या ठिकाणी अवैधरीत्या वाळुचा उपसा करणाºया ट्रॅक्टरचालकांची धावपळ उडाली. चालकांनी ट्रॅक्टर घेऊन धूम ठोकली. पळून जात असतानाच एका ट्रॅक्टरची ट्रॉली कलंडली. त्यामुळे चालकाने ट्रॉली जागेवरच सोडून ट्रॅक्टरचे हेड घेऊन पळ काढला. उलटलेली ट्रॉली जप्त करण्यात आली आहे.तहसीलचे कर्मचारी धावपळ करीत पोहोचले४जिल्हाधिकारी पी. शिवशंंकर रुग्णवाहिकेतून महातपुरी येथील वाळू घाटावर पोहोचले असून वाळू उपसा करणाºयांविरुद्ध कारवाई केली असल्याची माहिती समजल्यानंतर तहसीलच्या पथकाची धावपळ उडाली. काही वेळाने हे पथक वाळू घाटावर पोहोचले. तहसीलदार स्वरुप कंकाळ, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी शिवाजी मुरकुटे, चंद्रकांत साळवे आणि इतर कर्मचाºयांनी गोदावरी घाटाकडे धाव घेऊन ट्रॅक्टरची उलटलेली ट्रॉली ताब्यात घेऊन कार्यवाही पूर्ण केली.४जिल्हाधिकाºयांंनी सोमवारी केलेल्या या कारवाईमध्ये अवैध वाळू उपसा करणारी वाहने हाती लागली नसले तरी या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. तहसील प्रशासनाने कारवाईचे सातत्य ठेवले तर उपशाला लगाम लागू शकतो.अवैध वाळू उपशाकडे तहसीलचे दुर्लक्ष४गंगाखेड तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असताना तहसील कार्यालयातून मात्र कारवाई होत नाही. तहसीलचे अधिकारी, कर्मचारी वाळू उपशाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच या भागातील नागरिकांनी थेट जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी केल्या. जिल्हाधिकारी गंगाखेड येथे येऊन वाळू उत्खननाविरुद्ध कारवाई करीत असताना स्थानिक तहसील प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी काय करतात, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.४तालुक्यामध्ये गोदावरी नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नसल्याने नदीपात्रातील वाळुची चोरी थांबविण्याची जबाबदारी स्थानिक महसूल प्रशासनाची आहे. परंतु, वाळूचा सर्रास अवैध उपसा केला जात असल्याने प्रशासनाचीच जरब निर्माण होत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूcollectorजिल्हाधिकारी