शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा : ७९ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:44 IST

जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणीस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७९ गावातील विहिरी अधिग्रहित केल्या असून या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणीस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७९ गावातील विहिरी अधिग्रहित केल्या असून या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले आहे.मागील वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा फटका यावर्षी सहन करावा लागत आहे. जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच टंचाईच्या झळा बसण्यास प्रारंभ झाला. ग्रामीण भागातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत असल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया योजनांचे जलस्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. परिणामी ग्रामस्थांना शेतशिवारांमधून पाणी आणावे लागत आहे. पालम, पूर्णा, गंगाखेड या तालुक्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांची संख्या अधिक आहे. त्या तुलनेत परभणी, सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलू या तालुक्यांमध्ये पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध असल्याने टंचाईची दाहकता कमी आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असून त्यानुसार उपाययोजना सुरु केल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी उपलब्ध करण्यासाठी गाव परिसरात पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी अधिग्रहित करुन हे पाणी ग्रामस्थांसाठी खुले करुन दिले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गंगाखेड तालुक्यामध्ये विहीर अधिग्रहणासाठी ८५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी ३१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. पालम तालुक्यामध्ये १७, पूर्णा १६, जिंतूर ११, सेलू १, पाथरी २ आणि मानवत तालुक्यात एका गावात विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. परभणी आणि सोनपेठ या दोन तालुक्यातून एकही प्रस्ताव अधिग्रहणासाठी दाखल झाला नाही, हे विशेष. एकंदर जिल्ह्यात पाणीटंचाई वाढत चालली असून विहीर अधिग्रहणाबरोबरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करुन प्रशासन गावकºयांना पाणी उपलब्ध करुन देत आहे.अधिग्रहणाची ११४ प्रकरणे प्रलंबितविहीर अधिग्रहणासाठी ग्रामपंचायतस्तरावरुन दाखल झालेल्या एकूण प्रस्तावांपैकी ११४ प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यात गंगाखेड तालुक्यात ५४, पालम तालुक्यात ३१, पूर्णा ८, जिंतूर १० आणि सेलू तालुक्यातील ११ प्रस्ताव प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रस्तावांपैकी गंगाखेड तालुक्यातील २१ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर तर ३३ प्रस्ताव तहसीलदारांच्या स्तरावर प्रलंबित आहेत.पालम तालुक्यातील ३१ प्रलंबित प्रस्तावांपैकी गटविकास अधिकारी स्तरावर २० आणि तहसील स्तरावर ११ प्रस्ताव प्रलंबित आहेत. पूर्णा तालुक्यात ८ प्रस्ताव प्रलंबित असून त्यातील ५ गटविकास अधिकारी स्तरावर तर ३ तहसीलस्तरावर प्रलंबित आहेत. जिंतूर तालुक्यातील १० आणि सेलू तालुक्यातील ११ प्रस्ताव गटविकास अधिकारी स्तरावर प्रलंबित आहेत. गटविकास अधिकाºयांकडे एकूण ६७ प्रस्ताव प्रलंबित असून तहसीलस्तरावर प्रलंबित प्रस्तावांची संख्या ४७ एवढी आहे.१६ टँकरद्वारे पाणीपुरवठाटंचाईग्रस्त गावांना टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. मागील आठ दिवसांत टँकरची संख्याही वाढली असून सध्या १६ गावांना टँकरचे पाणी दिले जात आहे. त्यात गंगाखेड तालुक्यामध्ये खंडाळी, इळेगाव, गुंडेवाडी, उमरा नाईक तांडा या चार गावांमध्ये टँकर सुरु झाले आहे. पालम तालुक्यात रामापूर व रामापूर तांडा, नाव्हा, चाटोरी, आनंदवाडी या गावांमध्ये ६ टँकर सुरु करण्यात आले आहेत. त्यात नाव्हा येथे दोन तर चाटोरी येथे दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पूर्णा तालुक्यात ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून त्यात पिंपळा लोखंडे, हिवरा, वाई-लासिना, लोण खु. आणि आहेरवाडी या गावांचा समावेश आहे. जिंतूर तालुक्यात मांडवा या गावात टँकरद्वारे पाणी दिले जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईwater transportजलवाहतूक