शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परभणी जिल्ह्यात कर्जमाफीचे २५८ कोटी शेतकºयांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:14 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांपैकी ५३ हजार ८८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर अद्यापपर्यंत २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांपैकी ५३ हजार ८८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर अद्यापपर्यंत २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकºयाचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल केले. दाखल केलेल्या आॅनलाईन अर्जांचे जिल्ह्यामध्ये १ व २ आॅक्टोबर रोजी ६४४ गावांमध्ये चावडीवाचन पूर्ण करुन ५ आॅक्टोबरपर्यंत आलेल्या आक्षेप अर्जावर तालुकास्तरीय अंमलबजावणी समितीमध्ये कार्यवाही करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या कुटुंबासह प्रातिनिधीक सत्कार सोहळा १८ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला; परंतु, त्यानंतर शासनाने राज्यस्तरावरुन कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांच्या नजरा ग्रीनलिस्टकडे होत्या. या कर्जमाफीवर तब्बल १ महिना कोणतीही कार्यवाही होत नसल्याने कर्जमाफी मिळते की नाही, या विचारात जिल्ह्यातील शेतकरी अडकला होता. त्यानंतर शासनाकडून मध्यवर्ती, व्यापारी, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांना ८, २७, २८ नोव्हेंबर व ६ डिसेंबर रोजी पात्र लाभार्थी शेतकºयांच्या ग्रीनलिस्ट याद्या प्राप्त झाल्या. त्यानुसार जिल्ह्यातील ५३ हजार ८८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित १ लाख २७ हजार ५७ शेतकºयांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा करणे बाकी आहे.यासाठीची काही रक्कम जिल्ह्याला मिळाली आहे.बँक निहाय शेतकºयांच्या खात्यावर जमा रक्कमजिल्ह्यातील ५३ हजार ८८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर शासनाने २५८ कोटी ५८ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. यामध्ये स्टेट बँक आॅफ इंडियाने १० हजार ७२८ शेतकºयांच्या खात्यावर ७३ कोटी ३८ लाख रुपये वर्ग केले आहेत. तसेच बँक आॅफ महाराष्ट्रने ४ हजार २७३ शेतकºयांच्या खात्यावर २७ कोटी ९७ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ३१६ शेतकºयांच्या खात्यावर २ कोटी १८ लाख, युनियन बँकने ३२७ शेतकºयांच्या खात्यावर २ कोटी ४३ लाख, बँक आॅफ बडोदाने ३८१ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी १८ लाख, आंध्रा बँकेने ६२ शेतकºयांच्या खात्यावर २९ लाख, अलाहाबाद बँकेने २ हजार ५ शेतकºयांच्या खात्यावर १४ कोटी २७ लाख, कॅनरा बँकेने ६७४ शेतकºयांच्या खात्यावर ४ कोटी ५८ लाख, देना बँकेने १७६ शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी २५ लाख, इंडियन ओरसीस बँकेने ९९ शेतकºयांच्या खात्यावर ६८ लाख, सिंडीकेट बँकेने २१४ शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी ५१ लाख, युको बँकेने १ हजार ३८० शेतकºयांच्या खात्यावर ६ कोटी ३७ लाख, विजया बँकेने १९३ शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी ५० लाख तसेच सर्वाधिक महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १४ हजार १३६ शेतकºयांच्या बँक खात्यावर ८९ कोटी ९ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे.प्रोत्साहनपर रक्कमेचा ३१ हजार शेतकºयांना फायदाछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २०१५-१६ या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची ३० जून २०१६ पर्यंत पूर्णत: परतफेड केलेल्या शेतकºयांनी २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची पूर्ण रक्कम ३० जून २०१७ पर्यंत परतफेड केल्यास त्यांना पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार होती. यामध्ये जिल्ह्यातील ३१ हजार ८७८ शेतकºयांच्या बँक खात्यावर ४२ कोटी २३ लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे प्रोत्साहनपर रक्कमेचा आतापर्यंत ३१ हजार ८७८ शेतकºयांना लाभ मिळाला आहे.‘लोकमत’चा पाठपुरावाकर्जमाफी योजनेअंतर्गत १० डिसेंबरपर्यंत जिल्ह्याला २८७ कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली होती. परंतु, ही रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली नव्हती. १५ नोव्हेंबरच्या अंकात ‘लोकमत’ ने ‘जिल्ह्यात ६० कोटी रुपयांची कर्जमाफी ’या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर पुन्हा जिल्ह्यासाठी २८७ कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली होती. ‘लोकमत’ने १० डिसेंबरच्या अंकात ‘जिल्ह्यातील बँकांना २८७ कोटी प्राप्त’या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्याला मिळालेली रक्कम लाभार्थी शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केली.