शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा : ३२ लाख वृक्षांची होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:26 IST

महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ १ जुलै रोजी जिल्ह्यामध्ये विविध विभागांतर्गत वृक्षरोपण मोहीम राबविली जाणार आहे़ यासाठी २५ लाख १७ हजार ६०४ रोपे उपलब्ध झाली आहेत़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ १ जुलै रोजी जिल्ह्यामध्ये विविध विभागांतर्गत वृक्षरोपण मोहीम राबविली जाणार आहे़ यासाठी २५ लाख १७ हजार ६०४ रोपे उपलब्ध झाली आहेत़राज्यामध्ये सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यावर नामी उपाय म्हणून राज्य शासनाने मागील दोन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम सुरू केली आहे़ या अंतर्गत २०१६ यावर्षी द्विकोटी वृक्ष लागवड योजना राबविली़ यामध्ये परभणी जिल्ह्यात २ लाख ८४ हजार ४८० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते़त्यानुसार १ जुलै २०१६ रोजी जिल्ह्यातील ३७ विभागांनी २ हजार ६१० ठिकाणी वृक्षांची लागवड केली़ त्यानुसार महाराष्ट्र शासनाने २०१७ ते २०१९ या दोन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे़२०१७ च्या पावसाळ्यामध्ये राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात आले़ या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यासाठी ७ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील विविध विभागांनी देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण केले़२०१८ या वर्षासाठी जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़यामध्ये महसूल विभागाला २८ हजार, पशू संवर्धन विभाग २५ हजार ८००, नगरविकास विभाग १ लाख २९ हजार ८००, उद्योग विभाग ६४ हजार, गृह विभाग ११ हजार ५००, गृह (कारागृह) ३ हजार, उर्जा विभाग ४० हजार ५००, सार्वजनिक आरोग्य सेवा ८९ हजार ५००, सार्वजनिक बांधकाम विभाग १८ हजार, ग्रामविकास विभाग ८ लाख १४ हजार ६४, कृषी विभाग २ लाख ४९ हजार १००, वन विभाग ६ लाख २४ हजार, सामाजिक वनीकरण विभाग ५ हजार ८३९, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ १ लाख, केंद्रीय रेल्वे विभाग ४५ हजार, कौशल्य विकास व उद्योजकता (आयटीआय) ९ हजार, जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींना या वृक्ष लागवड योजनेंतर्गत ७ लाख ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ जिल्ह्याला एकूण ३२ लाख ४० हजार ८ चे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ हे उद्दिष्ट संबंधित विभाग पूर्ण करतात की कागदावरच वृक्षारोपण करून उद्दिष्ट पूर्ण केल्याचा दिखावा करतात? याकडे संबंधित विभागांनी कटाक्षांनी लक्ष देणे आवश्यक आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार