शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:36 IST

गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशामुळे प्रशासकीयस्तरावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत आयोगाकडूनच स्पष्टीकरण यावे, अशी अपेक्षा काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशामुळे प्रशासकीयस्तरावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत आयोगाकडूनच स्पष्टीकरण यावे, अशी अपेक्षा काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.पुढील आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने सर्वत्र या निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार अधिकाºयांच्या बदल्यानांही मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाने १६ जानेवारी २०१९ रोजी अधिकाºयांच्या बदल्याच्या अनुषंगाने एक आदेश काढला आहे. त्या आदेशामुळे काही अधिकारी संभ्रमात सापडले आहेत. या आदेशात देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे की, ज्या अधिकाºयावर गुन्हे दाखल झाले आहेत व त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत, त्या अधिकाºयांना निवडणुकीशी संबंधित कामे देण्यात येऊ नयेत. त्यामुळे अशा अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही अधिकाºयांनी, निवडणुकीशी संबंधित गुन्हे दाखल असतील तर कामे देऊ नयेत, असाही या आदेशाचा अर्थ काढला आहे. त्यामुळे अधिकाºयांमध्येच याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे काही अधिकाºयांवर गुन्हे दाखल असताना त्यांची निवडणुकीच्या कामाच्या मुख्य प्रवाहात बदली करण्यात आली आहे. तर काही अधिकाºयांना त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे कारण पुढे करुन निवडणुकीशी संबंधित त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे अधिकारीही संभ्रमात सापडले आहेत.या प्रकरणी आता निवडणूक आयोगाच्याच वरिष्ठ अधिकाºयांनी आदेशाबाबत स्पष्टता आणावी, अशीही अपेक्षा या अधिकाºयांमधून व्यक्त होत आहे.२४ मार्च रोजी ग्रा.पं.च्या पोट निवडणुका४एप्रिल २०१९ ते जून २०१९ मध्ये मुदत संपणाºया आणि नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील ५५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व थेट निवडणुकीद्वारे भरावयाच्या सरपंचपदाच्या पोट निवडणुकीसाठी २४ मार्च रोजी मतदान होणार आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. तसेच दोन गावांमधील सरपंचाच्या रिक्त पदासाठी थेट जनतेतून सरपंचाची निवड केली जाणार आहे. या संदर्भातील आदेश राज्य निवडणूक आयोगाने २० फेब्रुवारी रोजी काढले आहेत. त्यानुसार २२ फेब्रुवारी रोजी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाली. ५ मार्चपासून अर्ज दाखल करता येणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकParliamentसंसदgram panchayatग्राम पंचायत