शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
4
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
5
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
6
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
7
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
8
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
9
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
10
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
11
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
12
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
13
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
15
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
16
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
17
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
18
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
19
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
20
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!

परभणी : विजेचा दाब वाढल्याने जळाली विविध उपकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:56 IST

अचानक उच्चदाबाने वीज पुरवठा झाल्याने शहरातील कारेगावरोड भागातील दत्तनगर येथील अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याचा प्रकार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी घडला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अचानक उच्चदाबाने वीज पुरवठा झाल्याने शहरातील कारेगावरोड भागातील दत्तनगर येथील अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याचा प्रकार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी घडला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.येथील कारेगावरोड भागातील दत्तनगरात वीज पुरवठा करणाऱ्या डीपीवरुन वारंवार विजेचा दाब कमी-अधिक होत आहे. यापूर्वी देखील वीज प्रवाह उच्चदाबाने झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी या संदर्भात महावितरणला माहिती दिल्यानंतरही हा बिघाड दुरुस्त केला नाही. परिणामी दररोज विजेचा लपंडाव आणि उच्चदाबाने वीज पुरवठा होत राहिला. सोमवारी दुपारी या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.काही वेळानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत झाला; परंतु, विजेचा दाब अचानक वाढल्याने परिसरातील अनेक घरांमधील विजेची उपकरणे जळाली आहेत. १० ते १२ जणांचे टीव्ही, काही जणांच्या घरातील फ्रीज, वॉशिंग मशीन, नळांच्या मोटारी, पंखे, ट्युब आणि सेटटॉप बॉक्स जळाले आहेत. या भागातील ८ ते १० जणांच्या घरात असा प्रकार घडला असून महावितरणच्या कारभाराविषयी रोष व्यक्त केला जात आहे.दरम्यान, या प्रकाराविषयी महावितरणकडे रितसर तक्रार केली जाणार असून नुकसानग्रस्त नागरिकांना महावितरणने भरपाई द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण