शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: जांभूळबेटाचा विकास आराखडा अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पालम ( परभणी ): तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या जांभूळबेटाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या जांभूळबेटाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे; परंतु, शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीमध्ये विकास आराखडा अडकला आहे. त्यामुळे या बेटाला अधिकाऱ्यांच्या उदासिनतेचा फटका बसला आहे.परभणी जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारे जांभुळबेट निसर्गरम्य ठिकाण प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षाचा बळी ठरत आहे. वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी बेटाच्या विकासासाठी पुढाकार घेत असले तरीही शासनाच्या इतर विभागाचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे बेटाच्या विकासाची अनेक कामे पूर्णत: ठप्प झाली आहेत. प्रादेशिक पर्यटन विभागाकडून जांभूळबेटाच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचे शासनाने ठरविले आहे; परंतु, अद्यापही मागील ६ महिन्यांपासून जांभूळ बेटाचा विकास आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयातच धूळखात पडून आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग व वनविभागाकडून अद्यापही अंदाजपत्रके दाखल करण्यात आलेले नाहीत. केवळ पालम तालुक्यातील सा.बां. उपविभागाने रस्ता व लेंडी नदीवरील पूलाचे अंदाजपत्रके तयार करून १८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल केलेली आहेत. पूर्णा तालुक्यातील उपविभागाने मात्र अद्यापही रस्त्याची अंदाजपत्रके तयार केली नाहीत. तसेच वनविभागाकडून पिचिंगवॉल व इतर कामाचे अंदाजपत्रके देण्यात आली नाहीत.जांभूळ बेटाचा जवळपास १५ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी तयार केला आहे. मात्र अद्यापही २ विभागाकडून वेळेवर अंदाजपत्रके दाखल करण्यात आली नसल्याने जिल्हा प्रशासनाला हा आराखडा प्रादेशिक पर्यटन विभागाकडे पाठविता आला नाही. अधिकाºयांच्या टोलवाटोलवीमुळे सध्यातरी जांभूळबेटाचा विकास आराखडा अडकला असून पर्यटक आतून नाराजीचा सूर उमटत आहे.जिल्हा प्रशासनाने घेतला पुढाकार४निसर्गरम्य जांभूळ बेटाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी आम्ही वेळोवेळी जांभूळ बेटाला भेट देऊन पाहणी केलेली आहे. तसेच या ठिकाणी कोणती कामे करावयाची याची संबंधित विभागाच्या प्रमुखांना सोबत घेऊन पाहणी करत सूचना केलेली आहे. हा एकत्रित प्रकल्प आराखडा असल्याने तो सर्व विभागाचे अंदाजपत्रक आल्याशिवाय पुढील कारवाईसाठी पाठविणे शक्य नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या प्रमुखांना तातडीने अंदाजपत्रके सादर करावीत, असे आदेशित करण्यात आले असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीriverनदीgodavariगोदावरी