शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना अंगणवाडी सेविकांनी कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:31 IST

अंगणवाडी सेविकेच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पर्यवेक्षिकेला निलंबित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी सोमवारी जि़प़चे मुख्य प्रवेशद्वार बंद करून महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना सीईओंच्या कक्षात कोंडले़ पदाधिकाºयांच्या हस्तक्षेपानंतर पर्यवेक्षिका ए़ए़ गुंजोटीकर यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अंगणवाडी सेविकेच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पर्यवेक्षिकेला निलंबित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी सोमवारी जि़प़चे मुख्य प्रवेशद्वार बंद करून महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना सीईओंच्या कक्षात कोंडले़ पदाधिकाºयांच्या हस्तक्षेपानंतर पर्यवेक्षिका ए़ए़ गुंजोटीकर यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़पंचायतराज समितीच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील नागणगाव येथील अंगणवाडी सेविका सुमित्रा भगवान राखुंडे यांना पर्यवेक्षिका व तालुका महिला व बालविकास अधिकारी यांनी २००८ पासूनचे रेकॉर्ड सादर करण्यास सांगितल्याने व तसे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने या दबावातून त्यांनी ७ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती़ मयत अंगणवाडी सेविका राखुंडे यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत त्यांच्यावर कशा प्रकारे दबाव आला, दिरंगाईने मिळणारे त्रोटक मानधन, मानधन मिळत नसतानाही अंगणवाडी चालविण्यासाठी केलेली कसरत, रेकॉर्ड का उपलब्ध नाही, याबाबतची माहिती नमूद करण्यात आली होती़ राखुंडे यांनी तेथील पर्यवेक्षिका व महिला व बालविकास अधिकाºयांच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप करून त्यांना निलंबित करावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाने ८ नोव्हेंबर रोजी दिले होते़ त्यानंतर २० नोव्हेंबर रोजीही या प्रकरणी कारवाई न झाल्यास २७ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता़ परंतु, या निवेदनाची दखल न घेतल्याने सोमवारी सकाळपासून जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरंगड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले़