शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सहा केंद्रांवर साडेपाच क्विंटल प्लास्टिक जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:39 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेने सुरू केलेल्या प्लास्टिक संकलन केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तीन दिवसांमध्ये जवळपास साडेपाच क्विंटल प्लास्टिक या केंद्रावर जमा झाल्याची माहिती मनपाचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेने सुरू केलेल्या प्लास्टिक संकलन केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तीन दिवसांमध्ये जवळपास साडेपाच क्विंटल प्लास्टिक या केंद्रावर जमा झाल्याची माहिती मनपाचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी दिली़महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने प्लास्टिक बंदी घोषित केली आहे़ त्यामुळे शहरात स्वच्छतेबरोबरच प्लास्टिकमुक्त शहर ही चळवळ राबविली जात आहे़ २ आॅक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढून प्लास्टिक बंदीची जनजागृती केली़प्लास्टिकच्या वापराने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत़ त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकच्या वस्तू वापरणे टाळावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले़ आयुक्त रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये प्लास्टिक मुक्तीची चळवळ राबविली जात आहे़ या अंतर्गत गंगाखेड नाका, गणपती मंदिर, नटराज रंग मंदिर, गांधी पार्क, कारेगाव रोडवरील उघडा महादेव मंदिर आणि वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात प्लास्टिक संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे़ या केंद्रामध्ये तीन दिवसांत साडेपाच क्विंटल प्लास्टिक जमा झाले असल्याची माहिती मिळाली़ घरातील टाकाऊ प्लास्टिकचा कचरा संकलन केंद्रात जमा करून घेतला जात आहे़रस्त्यासाठी होणार वापरपरभणी शहरात जमा झालेले सर्व प्लास्टिक रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणार आहे़ डांबरी रस्त्यांचे आयुष्यमान वाढावे, या उद्देशाने मागील काही महिन्यांपासून रस्ता कामात प्लास्टिकचा वापर होत आहे़ तेव्हा शहरातील जमा झालेला प्लास्टिकचा कचरा रस्त्याच्या कामासाठी दिला जाणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीPlastic banप्लॅस्टिक बंदीMuncipal Corporationनगर पालिका