शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : एक लाखाची मागितली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:47 IST

खाजगी व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टरला धमकावून एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): खाजगी व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टरला धमकावून एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मानवत येथील संत सावतामाळी चौकाजवळील व्यापारी संकुलात डॉ.भागवत हरिमकर यांचा दवाखाना आहे. सोमवारी दुपारी डॉ.हरिमकर रुग्णांची तपासणी करीत असताना एक महिला व एक पुरुष दवाखान्यात आले. पोट दुखत असल्याने ही महिला दवाखान्यात आली होती. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. त्याचवेळी महिलेसोबत असलेला एकजण मोबाईलवर व्हिडिओ शुटींग करीत असल्याचे निदर्शनास आले. या व्यक्तीस मोबाईल मागितला असता तो देण्यास नकार दिला. त्यानंतर डॉक्टर हरिमकर यांनी औषध विक्रेते माणिक रोडे यांना बोलावून घेतले. महिला व तिच्या साथीदाराला ताब्यात घेतल्यानंतर त्या दोघांनी इतर दोघांनी आपल्याला दवाखान्यात पाठविले असल्याचे सांगितले.काही वेळातच इतर दोघेही दवाखान्यात आले. ‘तुम्ही बोगस डॉक्टर आहात, पोलीस ठाण्यात तक्रार करतो’ अशी धमकी देऊन त्यांनी डॉ.हरिमकर यांच्याकडे १ लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार सुरु असतानाच दवाखान्याच्या परिसरात असलेल्या शेजाऱ्यांनी त्या चौघांनाही पकडून पोलीस ठाण्यात हजर केले. या प्रकरणी चारही जणांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी