शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:58 IST

जिंतूर तालुक्यातील गणेशनगर तांडा येथे विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २६ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तालुक्यातील गणेशनगर तांडा येथे विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २६ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.निलेश राठोड असे मयत युवकाचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २६ आॅक्टोबर रोजी सकाळी निलेश राठोड हा गणेशनगर तांडा परिसरातील शेतात कामासाठी गेला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याचे वडील ज्ञानदेव राठोड हे जेवणाचा डबा घेऊन शेतात आले तेव्हा त्यांना गणेश दिसला नाही. त्यामुळे ज्ञानदेव राठोड यांनी त्याचा शोध घेतला असता शेतातील विहिरीच्या पाण्यात हालचाल होताना त्यांच्या निदर्शनास आली. शेजाऱ्यांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला तेव्हा निलेश राठोड मिळून आला. त्याला तत्काळ येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाºयांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू४परभणी : धावत्या रेल्वेखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना २७ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पिंगळी ते परभणी या दरम्यानच्या रेल्वेमार्गावरुन एक मालगाडी परभणीकडे येत असताना साधारणत: ४० ते ४५ वर्षांच्या व्यक्तीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मालगाडीच्या पायलटने वॉकीटॉकीवरुन परभणी येथील उप रेल्वेस्टेशन मास्तर विवेककुमार सिकंदर यांना दिली. त्यानंतर विवेककुमार यांनी नवा मोंढा पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत व्यक्तीची उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. पोलीस नायक नरोजी रणमाळ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यूrailwayरेल्वे