शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परभणी : जिल्हाभरात ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : २००५ नंतर सेवेत आलेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २००५ नंतर सेवेत आलेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, यासह विविध प्रलंबित मागण्या संदर्भात ग्रामसेवक संघटनांनी जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर ९ आॅगस्ट रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.शासन दरबारी प्रलंबित असलेले विविध प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत, या मागणीसाठी महाराष्टÑ राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने ९ आॅगस्ट रोजी परभणी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.या आंदोलनात राहुल पाटील, संतोष जाधव, आनंद खरात, एस.एल. खटींग, बी.बी. लांडे, एस.डी. धरणे, पी.ए. हरकळ, ए.आर. लाडेकर, व्ही.ए. पवार, के.आर. गव्हाणे आदींसह तालुक्यातील ग्रामसेवक सहभागी झाले होेते.सोनपेठमध्ये प्रशासनाला निवेदनप्रवास भत्यात सुधारणा करावी, यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर शुक्रवारी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.या आंदोलना दरम्यान ग्रामसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अशोक भोसले, आर.पी. सोळंके, एल.डी. पितळे, आर.बी. पवार, बी.एन. मुंडे, एस.व्ही. चौधरी, एस.आर. नरारे, एम.के. सय्यद, एस.ए. देशपांडे, पी.एम. शेळके, व्ही.व्ही. धरणे, पी.ए. कदम, व्ही.व्ही. शिंदे, बी.आर. मोरे, एस.बी. सोळंके, आर.बी. सरवदे, के.आर. शिंदे, एन.एन. जोगदंड, एम.बी. भालेकर, जी.पी.यादव, पी.एम. भोसले, एस.एस. भोसले, बी.बी. पवार, एस.ए. भवर, एस. आर. देशमुख आदी सहभागी झाले होते.ग्रामसेवक संघटना, पाथरीयेथील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने शुक्रवारी पं.स. कार्यालयासमोर धरणे अंदोलन करण्यात आले. आंदोलनात आर.टी. राठोड, के.जी. फंड, व्ही.के. घाटूळ, एस.बी. गमे, जी.एस. मदनकर, व्ही.बी. ठोंबरे, आर.जे. आडसकर, आर.डी. संगेवार, पी.एस. चौधरी, जी.एस. देवडे, के.एम. बोरवंडकर, एस.बी. घुंबरे आदी ग्रामसेवक सहभागी झाले होते.ग्रामविकास मंत्र्यांना निवेदनपूर्णा- तालुक्यातील ग्रामसेवकांनी ९ आॅगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंंदोलन केले. त्यानंतर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत शासनास निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात अशोक खुपसे, केशव भूसारे, तुकाराम साठे आदी ग्रामसेवक सहभागी झाले होते.सेलूत तालुका प्रशासनाला निवेदनविविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने शुक्रवारी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष आर.एस. वाव्हळे, अजय जैस्वाल, एम.यु. शिवभगत, आर.एन. बोरुडे, जीवन खरात, के.ए. झुकाटे, एन.ई. भोसले यांच्यासह सर्व २८ ग्रामसेवक आणि कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर तहसील प्रशासनाला ग्रासमेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.ग्रामसेवक संघटनेचे गंगाखेड येथे आंदोलन४शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी तालुक्यातील ग्रामसेवकांनी महाराष्टÑ राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष डी.बी. केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली ९ आॅगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले.४या आंदोलनात कुलदीप मादरपल्ले, के.व्ही. मुंडे, बी.डी. भोसले, एम.एन. अष्टुरे, आर.व्ही. नलवाड, ए.एस. वैरागड, के.एन. लटपटे, एम.बी. मुंडे, आर.बी. रेंगे, एस.डी. पांडे, डी.एम. मुंडे, ए.बी. पतंगे, ए.आर. फड, एस.के. कदम, पी.डी. आळणे, वर्षा साळवे, यु.डी. खुपसे, पी.आर. जाधव, एन.डी. मुंडे, आर.के. गिते, एच.डी. खुपसे, एस.बी. तिडके, पी.व्ही. कांबळे, ए.जी. पांचाळ, एम.बी. कांबळे, डी.एम. घुंबरे, पी.आर. बोरीकर, बी.एन. सांगळे, डी.बी. नाहनाळे, एम.पी. कारले, बी.एम. तोंडगे आदी सहभागी झाले होते.मानवतमध्येही आंदोलन४मानवत - राज्यातील २२ हजार ग्रामसेवक संवर्गाच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे या मागण्यांसाठी तालुक्यातील ग्रामसेवकांनी ९ आॅगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.४या अंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष एम.व्ही. व्हरकटे, सचिव के.टी. कानडे, उपाध्यक्ष पी.एम. घाटगे यांच्यासह सर्व ग्रामसेवक सहभागी झाले होते.पालम येथील तहसीलसमोर धरणे४पालम- येथील तहसील कार्यालयासमोर पंचायत समितीमधील ग्रामसेवकांनी विविध मागण्यासाठी ९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे. त्यामुळे दिवसभर कामानिमित्त पं.स. कार्यालयात आलेल्या ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागला.४या आंंदोलनात तालुकाध्यक्ष केशव खाडे, सचिव गजानन शेवटे, अजित तांदळे, सिंधू कीर्तनकार, नागेश कंटेकर, अच्युत भालेराव, सुनील एरंडे, बाळू पवार, आकाश सोनाळे, नंदू बेलके, विनोद नागरे, सीताराम जाधव, विनोद टोम्पे, रेश्मा चव्हाण आदीसह ग्रामसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.जिंतुरात निवेदन४जिंतूर- ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिंतूर पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामसेवक युनियन तालुका शाखेच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.४यावेळी तालुक्यातील ग्रामसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते. आंदोलनानंतर तहसील प्रशासनाला ग्रामसेवक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनTahasildarतहसीलदार