शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शिवालयांमध्ये भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:31 IST

जिल्ह्यातील शिवालयांमध्ये सोमवारी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बम बम भोलेचा गजर करीत अनेक शिवभक्तांनी भक्तीभावे दर्शन घेतले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शिवालयांमध्ये सोमवारी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बम बम भोलेचा गजर करीत अनेक शिवभक्तांनी भक्तीभावे दर्शन घेतले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.परभणी शहरामध्ये महादेव मंदिरात भल्या पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नांदखेडारोडवरील पारदेश्वर मंदिर, बेलेश्वर मंदिरात दिवसभर भाविकांची रिघ पहावयास मिळाली. विशेष म्हणजे महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. शहरामध्ये महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मागील काही दिवसांपासून हरिनाम सप्ताहाचेही आयोजन केले होते. सोमवारी कीर्तन, प्रवचन कार्यक्रमांबरोबरच महादेवाच्या पिंडीस अभिषेकही करण्यात आले. जलाभिषेक, दुग्धाभिषेक करुन भाविकांनी शिवरात्र साजरी केली. महाशिवरात्रीसाठी बेल आणि पुष्पांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. महादेवाच्या पुजेला बेलाचे महत्त्व असल्याने शिवमंदिरासमोर विक्रेत्यांनी स्टॉल लावून बेल-पुष्पांची विक्री केली.पारदेश्वर मंदिरात उशिरापर्यंत रांगा४येथील पारदेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ७.३० वाजता मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरुन ही शोभायात्रा परत मंदिरापर्यंत पोहोचली. त्यानंतर भाविकांनी अभिषेक केले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी उशिरापर्यंत रांगा लावून भाविकांनी दर्शन घेतले.दामोदर यांचे प्रवचन४पिंगळी- महाशिवरात्रीनिमित्त पिंगळी बाजार येथे शिवलीलामृत कथेचे प्रवचन झाले. शि.भ.प. शंकर दामोदर यांनी कथेचा अर्थ सांगितला. ज्ञानेश्वर भवर यांनी कथा वाचन केले. तसेच गोकुळनाथ महाराज मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त राम महाराज पिंपळेकर यांचे कीर्तन पार पडले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कुंभारीतही महाशिवरात्री उत्साहात४परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार येथे महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. येथील महादेव मंदिरात कुंभारीसह परिसरातील गावांमधून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना साबुदाण्याची खिचडी प्रसाद म्हणून देण्यात आली. माजी सरपंच मारोती इक्कर, पांडुरंग जुंबडे, रामा इक्कर, बाळू इक्कर, नवनाथ पिंगळे, विक्रम जुंबडे, रामा जुंबडे, राजू इंगोले, शिवाजी इक्कर, अर्जुन इक्कर, तुकाराम जुंबडे, शिवाजी जुंबडे आदींनी हा उपक्रम राबविला.रामपुरी येथे यात्रा महोत्सव४पाथरी- तालुक्यातील रामपुरी खु. येथील गोदावरी नदीकाठावरील रत्नेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळी नदीपात्रात स्नान करुन भाविकांनी रत्नेश्वराचे दर्शन घेतले.

टॅग्स :parabhaniपरभणी