शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पावणेसात कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:27 IST

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्ह्यासाठी ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांच्या वेतनाचा अनेक महिन्यांपासूनचा प्रश्न निकाली निघणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्ह्यासाठी ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांच्या वेतनाचा अनेक महिन्यांपासूनचा प्रश्न निकाली निघणार आहे़राज्य शासनाच्या वतीने निराधार लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण केले जाते़ यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना राबविली जाते़ या योजनेंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांना जगण्यासाठी साधन उपलब्ध झाले आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या लाभार्थ्यांची निवड करून त्यांना प्रत्येक महिन्याला अनुदानाचे वितरण करण्यात येते़ मात्र मागील तीन महिन्यांपासून श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी अनुदान उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांचे वेतन रखडले होते़ त्यामुळे या गोरगरीब लाभार्थ्यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा टाकला होता़राज्य शासनाने १९ मार्च रोजी एका निर्णयाद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेच्या अनुदानासाठी निधी वितरणास मंजुरी दिली आहे़ २०१७-१८ या आर्थिक वर्षातील जानेवारी २०१८ ते मार्च २०१८ या तीन महिन्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे़याच शासन आदेशानुसार परभणी जिल्ह्यासाठी ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपयांचा निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे़ हा निधी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर त्याचे तालुकानिहाय वितरण केले जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लाभार्थ्यांचे रखडलेले वेतन होण्याची शक्यता आहे़वितरणासंदर्भात निर्देशसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अव्वर सचिव ए़ के़ अहिरे यांनी शासन निर्देशानुसार श्रावणबाळ योजनेसाठी अनुदान मंजूर केले आहे़ जिल्हाधिकारी स्तरावर हे अनुदान वितरित होणार असून, जिल्हाधिकाºयांनी प्राप्त झालेले अनुदान तालुक्याच्या आवश्यकतेनुसार वितरित करावे, असे सूचित केले आहे़ वितरित अनुदानापेक्षा अधिकचा खर्च होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे़३८ हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभश्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये ३८ हजार ३६८ लाभार्थ्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जातो़ त्यात ३० हजार २४३ लाभार्थ्यांना प्रतीमहा ४०० रुपये आणि ८ हजार १२५ लाभार्थ्यांना प्रतिमहा ६०० रुपये अनुदान दिले जाते़या सर्व लाभार्थ्यांच्या अनुदानापोटी प्रत्येक महिन्यात २ कोटी २५ लाख १२ हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे़ परभणी जिल्ह्याला तीन महिन्यांसाठी ६ कोटी ७५ लाखांचे अनुदान वितरणास मंजुरी मिळाली आहे़जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविलेल्या पात्र लाभार्थी संख्येवर अधारित या निधी वितरणास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नोंदणीकृत लाभार्थ्यांचा अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorतहसीलदारcommissionerआयुक्तMONEYपैसा