शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

परभणी:कापूस जिनिंगला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:11 IST

रळीरोडवर असलेल्या प्रसाद फायबर्स प्रा.लि. या जिनिंगमध्ये २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : परळीरोडवर असलेल्या प्रसाद फायबर्स प्रा.लि. या जिनिंगमध्ये २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.शहरापासून जवळच परळी रोडवर असलेल्या प्रसाद फायबर्स प्रा.लि. या जिनिंगमध्ये कापसाची गंजी लावण्याचे काम सुरू असताना २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कापसाने अचानक पेट घेतला. यावेळी जिनिंगमध्ये असलेल्या कामगारांनी अग्नीरोधक यंत्राच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने गंगाखेड नगरपालिका, परभणी महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या वाहनांसह शहरातील खाजगी पाण्याच्या टँकरने जळालेल्या कापसाच्या गंजीवर पाणी मारून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तपत्या उन्हात असलेल्या कापसाने अधिकच पेट घेतला. या घटनेत जिनिंगमध्ये असलेल्या २ हजार क्विंटल कापसाला आगीच्या झळा पोहचल्याने यात अंदाजे ७० ते ७२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार जिनिंग मालक हरिप्रसाद भिक्कूलाल सोनी (रा. शिक्षक कॉलनी, गेवराई जि. बीड) यांनी पोलीस ठाण्यात दिल्याने आकस्मीत जळीताची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पो.ना. प्रल्हाद मुंडे करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगcottonकापूस