शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:पूर्णा नगराध्यक्षांविरुद्ध नगरसेवकाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:19 IST

पूर्णा येथील नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या कामकाजासंदर्भात नगरसेवक मुकूंद भोळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे अनियमित कामकाजासंदर्भात तक्रार केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पूर्णा येथील नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या कामकाजासंदर्भात नगरसेवक मुकूंद भोळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे अनियमित कामकाजासंदर्भात तक्रार केली आहे.याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, नगराध्यक्षा एकलारे यांचे काम त्यांचे नातेवाईक पाहतात. शिवाय त्यांचे नातेवाईकच कंत्राट घेण्याचे काम करतात. मर्जीतील कंत्राटदारांना त्यांच्याकडून कामे दिली जातात. यासाठी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्याकडूनही सदोष कार्यपद्धतीचा वापर केला जात आहे. त्यामुळे किरुळकर यांच्यावर कारवाई करुन एकलारे यांना पदावरुन हटवावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी ६४ कामे पूर्ण झाली नसताना ती अंदाजपत्रकाप्रमाणे व चांगल्या गुणवत्तेची झाल्याचे बनावट प्रमाणपत्र घेऊन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, असेही निवेदनात भोळे यांनी म्हटले आहे. निवेदनासोबत त्यांनी ६४ कामांची यादीही जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.नियमानुसारच कामे केली -गंगाबाई एकलारे४नगरपालिका सर्वसाधारण सभा व जिल्हाधिकाºयांच्या परवानगीनेच विकासकामे करण्यात आली आहेत. यापूर्वीही तक्रारीनंतर याबाबत चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये तथ्य आढळले नाही. नगराध्यक्ष पदाचा कारभार मी स्वत: पाहते, त्यात कोणाचाही हस्तक्षेप नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाcollectorजिल्हाधिकारी