शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दिवाळी सुट्यांबाबत शिक्षण विभागातच संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 23:49 IST

आगामी दिवाळीच्या सुट्यांबाबत शिक्षण विभागातच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागाने दोन वेगवेगळे पत्रके काढून शिक्षकांना सुट्यांची माहिती दिल्याने नेमक्या दिवाळीच्या सुट्या किती तारखेपर्यंत असा प्रश्न आता शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आगामी दिवाळीच्या सुट्यांबाबत शिक्षण विभागातच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागाने दोन वेगवेगळे पत्रके काढून शिक्षकांना सुट्यांची माहिती दिल्याने नेमक्या दिवाळीच्या सुट्या किती तारखेपर्यंत असा प्रश्न आता शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.यावर्षी दिवाळी सणापूर्वीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून, २१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात विधानसभेचे मतदान होत आहे. मात्र त्यामुळे दिवाळी सुट्यांमध्ये अंशत: बदल करण्यात आल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने काढलेल्या पत्रानुसार २४ आॅक्टोबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या राहतील आणि १४ नोव्हेंबर रोजी शैक्षणिक सत्राला सुरुवात होईल, असे पत्र काढले आहे. सर्व मुख्याध्यापक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.दुसरीकडे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिवाळी सुट्यांसंदर्भात काढलेल्या पत्रात २१ आॅक्टोबरपासून ते ९ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या राहतील आणि ११ नोव्हेंबरपासून शाळा पूर्ववत सुरू होतील, असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्या ११ नोव्हेंबरपर्यंत की १४ नोव्हेंबरपर्यंत असा संभ्रम निर्माण झाला आहे.दोन्ही विभागाचे दोन वेगवेगळे पत्र काढण्यात आल्याने दिवाळीच्या सुट्यांबद्दल शिक्षण विभागातच संभ्रमाचे वातावरण असल्याचेही समोर आले आहे.निवडणुकीमुळे संभ्रमजिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान २१ आॅक्टोबर रोजी असल्याने २१ आॅक्टोबरपूर्वी दिवाळीच्या सुट्या की मतमोजणी झाल्यानंतर या विषयी संभ्रम असल्याने दोन्ही विभागांनी वेगवेगळे पत्र काढून सुट्यांची माहिती दिली़ दोन्ही पत्रातील भिन्न माहितीमुळे शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये मात्र संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे़नेमक्या सुट्या कधीपासूनविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू असून, २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने २४ आॅक्टोबरपासून दिवाळी सुट्या राहतील, असा बदल केला आहे. मात्र प्राथमिक शिक्षण विभागाने २१ आॅक्टोबरपासून म्हणजे मतदान झाल्यानंतरच दिवाळीच्या सुट्या लागू होतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेमक्या सुट्या कधीपासून? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDiwaliदिवाळीEducationशिक्षण