शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : नव्या नळ जोडणीसाठी शास्तीत सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:49 IST

नवीन पाणीपुरवठा योजनेवर जास्तीत जास्त नळ जोडणी व्हावी, या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या शास्तीवर ५० टक्के तर नळ पट्टीच्या शास्तीवर १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नळ जोडणी घेण्यासाठी नागरिक पुढाकार घेतील, अशी अपेक्षा वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नवीन पाणीपुरवठा योजनेवर जास्तीत जास्त नळ जोडणी व्हावी, या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या शास्तीवर ५० टक्के तर नळ पट्टीच्या शास्तीवर १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नळ जोडणी घेण्यासाठी नागरिक पुढाकार घेतील, अशी अपेक्षा वाढली आहे.शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीवर अधिकृत नळजोडणी दिली जात आहे. ही जोडणी घेण्यासाठी नागरिकांना मालमत्ता कर आणि नळपट्टीची थकबाकी जमा करणे बंधनकारक आहे. मनपाने चालू वर्षापर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचे मागणी बिल वाटप केले आहेत. त्यामध्ये थकीत व चालू कराची रक्कम दिली असून, विलंब शास्ती व अनाधिकृत बांधकामाची शास्ती नमूद केली आहे. जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी अधिकृत नळ जोडणी घ्यावी, या उद्देशाने मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या थकबाकीवर आकारण्यात आलेल्या विलंब शास्तीमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २५ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत कराचा भरणा केल्यास मालमत्ता कराच्या विलंब शास्तीवर ५० टक्के आणि पाणीपट्टीच्या विलंब शास्तीवर १०० टक्के सूट दिली जाणार आहे.बांधकामे अधिकृत करण्याचीही मुभा४शासनाच्या निर्णयानुसार ४ जानेवारी २००८ रोजी व त्या तारखेनंतर जे अवैध बांधकाम, पूर्न बांधकाम केले जाईल, अशा सर्व बांधकामांना अनाधिकृत बांधकामांची शास्ती आकारणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर ४ जानेवारी २००८ पूर्वी असणाऱ्या बांधकामधारकांनी पुरावे सादर करण्याचे आवाहन केले होते. मात्र या योजनाचा लाभ अनेक बांधकामधारकांनी घेतला नाही. त्यामुळे या बांधकामांच्या बिलांमध्ये अनाधिकृत बांधकामांची शास्ती नमूद करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी मनपाने आणखी एक संधी दिली असून, बांधकाम ४ जानेवारी २००८ पूर्वीचे असल्यास व त्याचे पुरावे सादर केल्यास अनाधिकृत बांधकामाची शास्ती कमी करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. नागरिकांनी प्रभाग समितीमध्ये हे पुरावे सादर करुन शास्ती कमी करुन घ्यावी, असे आवाहन आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी