शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : देश वाचविण्यासाठी एकत्र या- कन्हैय्या कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:39 IST

सीएए, एनआरसी या कायद्याच्या माध्यमातून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. तेव्हा देश वाचविण्यासाठी राजकारण सोडून एकत्र यावे, असे आवाहन विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : सीएए, एनआरसी या कायद्याच्या माध्यमातून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. तेव्हा देश वाचविण्यासाठी राजकारण सोडून एकत्र यावे, असे आवाहन विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी केले.केंद्र शासनाच्या धोरणांच्या विरोधात आ.बाबाजानी दुर्राणी यांनी २८ जानेवारी रोजी पाथरी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी कन्हैय्या कुमार बोलत होते. यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी मुजाहेद खान, कॉ़ राजन क्षीरसागर, जि़प़चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, मुंजाजी भाले पाटील, सारंगधर महाराज, अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, किरण सोनटक्के, नगराध्यक्ष मीना भोरे, पं़स़सभापती कल्पना थोरात, चक्रधर उगले, उपनगराध्यक्ष हन्नानखान दुर्राणी, सुभाष कोल्हे, माधवराव जोगदंड, अशोक गिराम, तबरेज खान दुर्राणी, नगरसेवक हसीब खान, कलीम अन्सारी, युसूफोद्दीन अन्सारी, राजीव पामे, मोईज अन्सारी, राजेश ढगे, अलोक चौधरी यांची मंचावर उपस्थिती होती़कन्हैय्या कुमार म्हणाले, लोकांना रोजगार पाहिजे आहे. नोकरी मागितली किंवा सुरक्षा मागितली तरी कागद मागितला जात आहे. देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. अशा परिस्थितीत एनआरसीची काय गरज आहे. एनआरसी, एनपीआर, सीएएच्या माध्यमातून नागरिकता काढून घेण्याचा डाव आखला जात आहे. हा कायदा गरीब हिंदुच्याही विरोधात आहे. तेव्हा या विरोधात विना हिंसा आंदोलन उभे करावयाचे असून, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन कन्हैय्या कुमार यांनी केले.प्रारंभी प्रास्ताविकात आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी एनआरसी आणि सीएए हे कायदे कशा प्रकारे हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारे आहेत, हे सांगून मुस्लीम समाजाने या कायद्याच्या विरोधात आंदोलने करावीत; परंतु, ती अहिंसेच्या मार्गाने असावीत, असे सांगितले़ या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीkanhaiya kumarकन्हैय्या कुमारCentral Governmentकेंद्र सरकार