शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : एकाच दिवशी तीन ठिकाणी आगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:09 IST

तालुक्यातील आलापूर पांढरीसह सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी आणि पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे मंगळवारी आगीच्या घटना घडल्या असून कडबा, ऊस आणि शेती औजारे जळून खाक झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील आलापूर पांढरीसह सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी आणि पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे मंगळवारी आगीच्या घटना घडल्या असून कडबा, ऊस आणि शेती औजारे जळून खाक झाली आहेत.परभणी तालुक्यातील आलापूर पांढरी येथे १४ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेतातील कडब्याला आग लागली. पांढरी येथील शेषराव आबासाहेब धस यांनी शेतामध्ये कडब्याची गंजी करून ठेवली होती. दुपारच्या सुमारास अचानक आगीचा भडका उडाला. त्यामध्ये १ हजार कडबा, सोयाबीन भुश्याच्या पाच ते सात बॅग, स्प्रिंकलर सेट, नांगर, वखर आदी शेतीची औजारे जळून खाक झाली. सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. दरम्यान, आग लागल्याची माहिती समजताच गावातून टंँकर बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे ही आग इतर ठिकाणी पसरली नाही; परंतु, आगीत कडबा आणि इतर साहित्याचे नुकसान टळू शकले नाही.मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. तापमान वाढल्याने कडबा तसेच वाळलेल्या गवताला आग लागून शेती साहित्याचे नुकसान होत आहे. यापूर्वी पाथरी, सेलू, गंगाखेड, जिंतूर तालुक्यात आगीच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.वाघाळ्यात १० एकर ऊस जळून खाकच्पाथरी- तालुक्यातील वाघाळा येथील सदाशिव मुळे यांच्या शेतात आग लागून १० एकरवरील ऊस जळून खाक झाला. १३ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.च्वाघाळा परिसरात कालव्याच्या बाजूने सदाशिव मुळे यांचे कुटुंबिय शेतात घर करून राहतात. त्यांनी १० एकरमध्ये उसाची लागवड केली आहे. १३ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आग लागून ऊस जळून खाक झाला.च्गावातील टँकरच्या सहाय्याने पाणी टाकून आग आटोक्यात आणली. त्यामुळे ही आग घरापर्यंत पोहचली नाही. कोणी तरी आग लावली असावी, असा संशय मुळे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारी व्यक्त केला आहे. तसेच या आगीत ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.डिग्रसवाडीत कडबा जळालाच्सेलू- तालुक्यातील डिग्रसवाडी येथे लोंबकळलेल्या वीज तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत कडबा जळाल्याची घटना १४ मे रोजी घडली. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वीज तारांच्या घर्षणाने बांधावरील गवताने पेट घेतला. पाहता पाहता ही आग वाढत गेली. या परिसरातील पाशू खॉ मन्नान खान पठाण यांच्या शेतात ठेवलेल्या कडब्याने पेट घेतला.च्त्या शेजारील ठेवलेले सरपणही जळून खाक झाले. काही वेळातच सेलू नगरपालिकेची अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत साधारणत: दोन ते अडीच हजार कडबा जळाल्याने शेतकºयासमोर चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग