शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हाधिकाºयांनी घेतली कडक भूमिका : पालम, गंगाखेडचे तहसीलदार सक्तीच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:12 IST

गोदावरी नदीच्या अवैध वाळू उपस्यावरून झालेल्या कारवाईवरून पालमचे तहसीलदार रंगनाथ मेंडके यांना जिल्हाधिकाºयांनी सक्तीच्या रजेवर पाठविले असून, गंगाखेडचे तहसीलदार छडीदार हे स्वत:च रजेवर गेले असले तरी त्यांनाही रजेवर जाण्यासाठी सांगण्यात आले असल्याचे समजते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गोदावरी नदीच्या अवैध वाळू उपस्यावरून झालेल्या कारवाईवरून पालमचे तहसीलदार रंगनाथ मेंडके यांना जिल्हाधिकाºयांनी सक्तीच्या रजेवर पाठविले असून, गंगाखेडचे तहसीलदार छडीदार हे स्वत:च रजेवर गेले असले तरी त्यांनाही रजेवर जाण्यासाठी सांगण्यात आले असल्याचे समजते़जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी अवैध वाळू उपसा प्रकरणात कारवाईचा धडाका सुरू केला आहे़ या संदर्भात कामचुकारपणा करणाºया अधिकाºयांना त्यांनी चांगलेच धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे़ या संदर्भात जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पालम तालुक्यात दुटका गुंज येथे जवळपास ५ हजार ब्रॉस अवैध रेतीसाठा जप्त केला होता़ या संदर्भातील लिलाव करण्याचे आदेश त्यांनी तहसीलदार रंगनाथ मेंडके यांना दिले होते़ मेंडके यांनी प्रत्यक्षात ८०० ब्रॉसचाच लिलाव करून संबंधितांना पावती दिली़याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी पाहणी केली असता, प्रत्यक्ष अधिक वाळू साठा असल्याचे लक्षात आले़ या ठिकाणाहून अधिक वाळू नेली जात असताना काही वाहने पकडण्यात आली़ पंचनाम्यात जवळपास ५ हजार २०० ब्रॉस वाळू उपसा होत असल्याचे दिसून आले़ या पार्श्वभूृमीवर दंडापोटी १ कोटी रुपये वसूल करण्यात आले़ पिंपळगाव मुरूड येथेही ४ हजार ब्रास वाळू असताना मेंडके यांनी ९०० ब्रॉस वाळू दाखवून लिलाव केला़ त्यानंतर केलेल्या पाहणीत जवळपास अडीच हजार ब्रास वाळू पकडली गेली़ शिवाय अवैध वाळू उपसा करणाºया एका जेसीबी चालकालाही मेंडके यांनी दंड ठोठावला नाही़या कारणांमुळे कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी तहसीलदार रंगनाथ मेंडके यांना सक्तीच्या रजेवर पाठविले असून, त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी सांगितले़ त्यामुळे मेंडके यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे़दरम्यान, गंगाखेडचे तहसीलदार आसाराम छडीदार हेही रजेवर गेले आहेत़ रजेचे कारण त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचे सांगितले असले तरी अवैध वाळू उपसा व अवैध वाळूसाठ्यावरूनच त्यांना रजेवर जाण्यास सांगण्यात आले असल्याचे समजते़या संदर्भात जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तहसीलदार छडीदार हे वैद्यकीय रजेवर गेले असल्याचे सांगितले.डापकर यांच्यावरच पदभाराची मेहरबाणीसोनपेठचे तहसीलदार जीवराज डापकर यांच्यावर महसूल प्रशासन चांगलेच मेहरबाण झाल्याचे दिसून येत आहे़ काही महिन्यांपूर्वी डापकर यांना पालमच्या तहसीलदार पदाचा पदभार देण्यात आला होता़ आता पालमचा पदभार जीवराज डापकर यांच्याकडून काढून तो नायब तहसीलदार कदम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़ गंगाखेडचे तहसीलदार आसाराम छडीदार रजेवर गेल्यामुळे त्यांचा पदभार डापकर यांनाच देण्यात आला आहे़ विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सखाराम मांडवगडे, महसूल सहाय्यक तथा तहसीलदार विद्या शिंदे हे दोन तहसीलदार उपलब्ध असतानाही डापकर यांच्यावरच का मेहरबाणी दाखविली जात आहे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़महसूल विभाग करणार ड्रोन कॅमेºयांची खरेदीअवैध वाळू उपस्याला आळा घालण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने लवकरच ड्रोन कॅमेºयाची खरेदी करण्यात येणार आहे़ तशी माहिती जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी दिली़ खरेदी करण्यात येणाºया ड्रोनच्या माध्यमातून ५ ते १० किमीपर्यंत लक्ष ठेवण्यात येणार आहे़ शिवाय किती वाळू उपस्यास परवानगी देण्यात आली आहे व प्रत्यक्षात संबंधित ठेकेदारांकडून किती वाळू उपसा केला जात आहे, याकडेही या माध्यमातून लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले़