शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :विधान परिषद निवडणुकीची जिल्ह्यात आचारसंहिता लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:06 IST

निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला असून, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे़ या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला असून, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे़ या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापणार आहे़भारत निर्वाचन आयोगाने २० एप्रिल रोजी राज्यातील सहा विधान परिषद मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला आहे़ परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचा एक मतदार संघ असून, या स्थानिक संस्था मतदार संघातून एक सदस्य विधान परिषदेवर निवडून द्यावयाचा आहे़ सध्या आ़ बाबाजानी दुर्राणी हे या मतदार संघाचे सदस्य आहेत़ २१ जून रोजी त्यांचा कार्यकाळ संपतो़ त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे़ त्यानुसार परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे़ घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार २६ एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर केली जाणार असून, ३ मे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख आहे़ ४ मे रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे़ ७ मे ही अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख असून, २१ मे रोजी प्रत्यक्ष मतदान घेतले जाणार आहे़२४ मे रोजी मत मोजणी होणार आहे़ विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यात आता या जागेसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे़५०२ मतदार बजावणार हक्कपरभणी-हिंगोली या मतदार संघात एकूण ५०२ मतदार असून, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे़ मतदार संघातील मतदारांचे पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे़ या मतदार संघावर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून, येत्या काळात या निमित्ताने निवडणुकीचे वातावरण तापणार आहे़

टॅग्स :Parabhani civil hospitalजिल्हा रुग्णालय परभणीHingoliहिंगोलीparabhaniपरभणीElectionनिवडणूक