शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: रस्त्यासाठी नागरिकांचा मनपात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:31 IST

शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी जवळपास साडेतीन तास मनपात ठिय्या आंदोलन केले. महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या आश्नासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी जवळपास साडेतीन तास मनपात ठिय्या आंदोलन केले. महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या आश्नासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.परभणी शहरातील शाहूनगर, सावित्रीबाई फुलेनगर, लक्ष्मीनगर, भारत नगर, नेहरु नगर आदी भागात कच्चे रस्ते आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करणे कठीण झाले आहे. महानगरपालिकेचे या भागाकडे दुर्लक्ष असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी दुपारी १ वाजता मनपा कार्यालय गाठले. जोपर्यंत येथील रस्त्याचा प्रश्न सोडविला जात नाही, तोपर्यंत मनपातच बसून राहण्याचा निर्णय या नागरिकांनी घेतला. मनपा आयुक्त रमेश पवार हे विभागीय आयुक्तांच्या बैठकीत असल्याने ते चर्चेला आले नाहीत. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास महापौर मीनाताई वरपूडकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी बोलताना नगरसेविका डॉ.वर्षा खिल्लारे यांनी सांगितले की, सदरील जागा मनपाच्या ताब्यात नसल्याने त्या ठिकाणी मनपाचा निधी खर्च करता येत नाही; परंतु, या भागातील लोकवस्तीपाहता व रस्त्यांची स्थिती पाहता मनपाच्या स्व: उत्पन्नातून विशेष निधी देऊन येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती केली. त्यानंतर महापौरांनी येथील रस्त्याचा प्रश्न सोडविला जाईल, असे लेखी आश्वासन नागरिकांना दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात सचिन खरात, सूमन उफाडे, सूमन गाडे, सोनाली काचगुंडे, सोजरबाई हजारे, शांताबाई तुपसमिंद्रे, सुरेखा खरात, वंदना वाहुळे, लताबाई नंद, दराडे, झोडपे आदींनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाagitationआंदोलन