शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : एकाच टँकरवर पाण्यासाठी चाटोरीकरांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:57 IST

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटोरी या गावासाठी पाण्याचे एकच टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आणखी एक टँकर वाढून देण्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटोरी या गावासाठी पाण्याचे एकच टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आणखी एक टँकर वाढून देण्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे.तालुक्यातील चाटोरी हे गाव ६ हजार लोकसंख्येचे आहे. तालुक्यातील पहिला टँकर चाटोरी गावाला सुरू झालेला आहे. गावाजवळील नदी कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपातळी खालावल्याने शेतशिवारातील विंधन विहिरी व हातपंप कोरडे पडले आहेत. रात्र जागून पाण्यासाठी चाटोरीकरांचे हाल होत आहेत. प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर सुरू केले आहे. या टँकरची क्षमता कमी असून गावाला मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच टँकरला पाण्यासाठी रावराजूर येथे जावे लागते. एका दिवसात केवळ दोन फेऱ्या होत आहेत. यातून जेमतेम २० हजार लिटर पाणी मिळत आहे. गावाला किमान दररोज १ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याने पाण्यासाठी गोंधळ निर्माण होत आहे. त्या अगोदर चार-चार तास हंड्यांच्या रांगा लावून ठेवाव्या लागत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. दोन कि.मी. पायपीट करून घागरभर पाण्यासाठी कसरती करावी लागत आहे.नवीन टँकरची मागणी करूनही दुर्लक्ष४चाटोरी गावची लोकसंख्या मोठी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना शासनाने टँकर दिले आहे. मात्र या टँकरवर गावाची तहान भागत नाही. पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. अजून एक टँकर देण्यात यावे, अशी मागणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे; परंतु, अधिकारी व कर्मचारी या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. नवीन टँकर सुरू करण्यासाठी आचारसंहितेचे कारण सांगून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तत्काळ टँकर मंजूर न केल्यास या कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा चाटोरी येथील सरपंच गंगाधर मस्के यांनी दिला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई