शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :दुकानांसह कडब्याच्या गंजीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:00 IST

तालुक्यातील रेणापूर येथे कडब्याच्या गंजीला आणि शहरातील दोन दुकानांना लाग लागल्याची घटना रविवारी घडली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): तालुक्यातील रेणापूर येथे कडब्याच्या गंजीला आणि शहरातील दोन दुकानांना लाग लागल्याची घटना रविवारी घडली आहे़तालुक्यात उन्हाचा पारा वाढत चालला असून, दररोज आगीच्या घटना घडत आहेत़ २८ एप्रिल रोजी पाथरी तालुक्यातील रेणापूर वसंत नगर तांडा येथील श्रीमंत किशन राठोड यांच्या शेतातील कडब्याच्या वळईला दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास आग लागली़ अग्निशमन दलाचे कर्मचारी खुर्रम खान, बळीराम गवळी, निखिलेश वाडेकर यांनी घटनास्थळी जाऊन ही आग आटोक्यात आणली़ आग विझवून अग्निशमन दलाची गाडी शहरात दाखल होताच २़२५ वाजता माजलगाव रस्त्यावरील बाबा फर्निचर आणि महाराष्ट्र गादीघर या दोन दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली़ आगीत फर्निचर आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले़ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होवून ही आग आटोक्यात आणली़ या दोन्ही घटनांत जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे़ तालुक्यात आगीच्या घटना वाढल्या असून, १५ दिवसांमध्ये १० ठिकाणी आग लागली आहे़ नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात केवळ चार कर्मचारी नियुक्त असल्याने या कर्मचाऱ्यांना आग विझविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ पाथरी शहरासह मानवत, सोनपेठ आणि माजलगाव भागातही येथील अग्निशमन दल आग विझविण्याचे काम करीत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग